राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवक तालुका अध्यक्ष मनिष वजरे यांचा अजित पवार गटात अनेक कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - दिनांक.२६/१२/२०२३ ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची चिमूर तालुका प्रमुख तथा पदाधिकारी यांची बैठक चिमूर येथिल जिल्हा परिषद बांधकाम विभाग येथील विश्राम गृह याठिकाणी आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत चिमुर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निहाय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करुन गाव तेथे शाखा स्थापन करुन पक्ष वाढी संदर्भात पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शरद पवार गटाचे चिमुर तालुका अध्यक्ष मनीष वजरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या भूमिकेचे समर्थन करीत अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांसह पक्ष प्रवेश केला.सदर बैठकीत जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर ,अरविंद रेवतकर चिमूर विधानसभा अध्यक्ष ,योगेश ठुने तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली हि बैठक संपन्न झाली. या बैठकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनीष वजरे, स्वरूप तळवेकर, परमेश्वर ढोणे , मेहबूब भाई शेख, दिपक दुधे , राष्ट्रपाल गेडाम , बाबाकर खोब्रागडे, राजेंद्र मसराम ,संजय घरत , राहुल ढोणे, सुखदेव गराटे यांनी अजित पवार गटात पक्षात प्रवेश केला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!