नवभारत विद्यालय राजोली येथे पक्षी सप्ताह साजरा

नवभारत विद्यालय राजोली येथे पक्षी सप्ताह साजरा                                      


          पक्षीप्रेमी डॉ.सलिम अली यांचा जन्मदिन १२ नोव्हेंबर व निसर्ग व पक्षीप्रेमी श्री मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन ५ नोव्हेंबर या दिनांचे औचित्य साधून दरवर्षी  ५ ते १२ नोव्हेंबर दरम्यान संपूर्ण भारतात 'पक्षी सप्ताह' साजरा करण्यात येतो. नवभारत विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय राजोली येथे सुध्दा पक्षी सप्ताह साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रसिद्ध पर्यावरण स्नेही संस्था 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी' चे श्री सौरभ दंदे सर विद्यालयात उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्यांना पाॅवर पाईंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून पक्षी कुणाला म्हणायचे? पक्ष्यांची वैशिष्ट्ये, त्यांच्या प्रजाती, त्यांचे खाद्य, त्यांचा अधिवास या विषयी माहिती दिली.तसेच पक्ष्यांचे पर्यावरणातील व मानवी जीवनातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.आजमितीस लुप्त झालेल्या व लुप्त होत असलेल्या पक्ष्यांच्या प्रजाती विषयी माहिती दिली. पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन करणे आवश्यक आहे व ते कसे करता येईल याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
          या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री सुधाकर एस. पुराम सर, पर्यावरण शिक्षक श्री ईश्वर टांगले. बी.एन.एच.एस.चे श्री चरण शेंडे, पर्यावरण दूत शहेबाज पठाण व कुमारी नम्रता लाकडे तसेच बहुसंख्येने विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!