चिमूर तालुक्यातील संपूर्ण शासकीय यंत्रणा आमदार वाड्यावर

अधिकाऱ्यांच्या खुर्च्या खाली

सोमवार दिवस राहून शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांची गैरहजेरी

कामाविना आल्या पाऊली जनतेला जावे लागत आहे परत

उप संपादक
विलास मोहिनकर

चंद्रपूर : - दिनांक.०६ नोव्हेंबर २०२३ चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील सर्व शासकीय ऑफिस मध्ये शासकीय अधिकारी यांची गैरहजेरी असून काही कार्यालयाला कार्यालयीन वेळेत सुद्धा ताला लावलेला आहे. विविध कार्यालयामध्ये जाऊन बघितले असता चपराशी यांच्याकडून माहिती घेतली तर कर्मचारी - अधिकारी सर्व आमदार वाड्यावर गेल्याची माहिती समोर आली आहे.शासकीय कार्यालयाला शासनाने ५ दिवसाचा आठवडा जाहीर करून शनिवार रविवार असे दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे. परंतु असे असतांना सुद्धा जनतेची कामे करण्याचे सोडून दिवाळी स्नेह मिलन सोहळा निमित्ताने आमदार वाड्यावर सर्व कर्मचारी - अधिकारी यांची ऑफिस सोडून हजेरी लावली असल्याने जनतेला कामाविना आल्या पाऊली परत जावे लागत आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!