ग्राम चिचबोडी येथे गटविकास अधिकारी यांनी दिली भेट.
सावली प्रतिनिधी
ग्रामसभा व ग्रामपंचायत चिचबोडी द्वारा सुरू असलेल्या विविध उपक्रमांची पाहणी करण्यासाठी श्री. मधुकर वासनिक (गटविकास अधिकारी) पंचायत समिती, सावली. आपल्या पथकासोबत भेट दिली. सदर भेटीदरम्यान ग्रामपंचायत व वन हक्क परिक्षेत्रातील झालेल्या घरकुल, रस्ते, वृक्षलागवड इत्यादी कामाचा आढावा व पुढील नियोजनात रस्ते, क्रीडांगण, गोडाऊन, तलाव खोलीकरण इ. विशेषतः सामूहिक वनहक्क क्षेत्राच्या विकासासाठी 20 हेक्टरवर 20 हजार वृक्ष लागवड व रोपवाटिका तयार करण्याचे नियोजन करण्यात आले. या भेटीमध्ये ग्रामपंचायत सरपंच सतीश नंदगिरीवार, ग्रामसेवक सुभाष डहारे, रायपुरे, मनरेगाचे अधिकारी प्रशांत भोयर, नितीन दुआवर, रोशन येरोजवार, वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, जिल्हा परिषद मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी व टाटा सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी प्रवेश सुटे,नितीन ठाकरे उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!