तळोधी बा. येथे काँग्रेस च्या जन संवाद पदयात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद
तळोधी बा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आदेशानुसार ३सप्टेबर पासून जन संवाद यात्रेला सुरवात झाली. नागभीड तालुका काँग्रेस कमेटिच्या वतीने ८ सप्टेंबर रोजी बालापुर,गंगासागर हेटी,उश्राळमेंढा, वाढोणा, सावरगाव, वलनी व तळोधी बा. येथे जनसंवाद पदयात्रा काढण्यात आली. यावेळी तळोधी बा. येथील साईबाबा चे दर्शन घेऊन मुख्य मार्गाने गावातील रोडवरून जन संवाद पदयात्रेला सुरवात करण्यात आली. यावेळी मोदी सरकारने ९वर्षात जनतेला महागाई लोटांगण घालावे असे कृत्य केले. तसेच राज्यात बेरोजगारी वाढली असताना २कोटी नोकरी देण्याचे आश्वासन फोल ठरले, मोदी सरकारने अच्छे दिनाच्या नावाखाली शेतकयांची लुट केली. त्यामुळे राज्य कर्ते मस्त, प्रशासन सुस्त, व शेतकरी व शेतमजूर चिंता ग्रस्त अशी नागरिकांची परिस्थिती झाली आहे. तसेच भाजप ने महाराष्ट्रात फोडाफोडी चे राजकारण करून सत्ता स्थापन केली. मात्र हे सरकार जनतेच्या हितासाठी कुठल्याही प्रकारचा काम करताना दिसत नसुन नागरिकांनी केंन्दातील मोदी सरकार व महाराष्ट्र राज्य तील शिंदे फडणवीस सरकार ला हद्दपार करण्याचा निर्णय घ्यावा . असे आवाहन चिमुर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतिश वारजुरकर यांनी जनसंवाद पदयात्रेला संबोधीत करताना म्हटले. यावेळी सभेला महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक धनराज मुंगले,माजी जिल्हा परिषद सदस्य खोजराम मरस्कोल्हे, माजी सभापती राजेन्द्र बिरेवार, वसंतराव बडवाईक,विनोद बोरकर, वामनराव मदनकर , नागभीड तालुका अध्यक्ष प्रमोद चौधरी, सचिव शरद सोनवणे,नागभीड महिला अध्यक्ष प्रणयाताई गड्डमवार, नैनाताई गेडाम वसीम छुकारिया, डोनुजी पाकमोडे,विलास लांजेवार,मोनिल देशमुख,यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी काँग्रेस पक्षावर निष्ठा बाळगून भाजपचे सामाजिक कार्यकर्ते रामुजी कावळे, व सचिन ठवरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी जनसंवाद पदयात्रा सभेचे संचालन नागभीड तालुका ओबीसी अध्यक्ष संजय अगडे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला व पुरुष वर्गाची उपस्थिती होती. कार्यक्रम नंतर मसाला भाताचे वितरण करण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!