उत्कृष्ट कामाबद्दल चिमूर तालुक्यातीत गट विकास अधिकारी यांचा सत्कार

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चिमूर हा सर्वात मोठा तालुका असल्याने या परिसरात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्या विकासाच्या अनेक योजना पंचायत समिती चिमूर चे गट विकास अधिकारी राजेश राठोड यांनी राबवून शासनाला पाठपुरावा करून आपल्या तालुक्यातील विकास कामावर भर दिले पंचायत समिती चिमूर मध्ये आजपर्यंत अशी अनेक कर्तव्य दक्ष गट विकास अधिकारी आले आणि गेले या सर्वांनी कामासाठी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कधीही त्रास दिला नाही व वेळेवर कार्यालयात हजर राहून येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून त्यांना दिलासा दिला त्या गट विकास अधिकाऱ्या पैकी एक म्हणजेच राजेश राठोड याचा सत्कार शनिवार दिनांक. २९ एप्रिल २०२३ ला प्रियदर्शनी हॉल चंद्रपूर येथे झाला. जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत सन २०२२ - २३ मध्ये प्रशासनामध्ये गट विकास अधिकारी पदावर उत्कृष्ट काम करुन ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे व शेतकऱ्या जीवनमान उंचावण्यासाठी  सहकार्य केल्याबद्दल उत्कृष्ट अधीकारी पुरस्कार मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री महा. राज्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!