दिव्यांग विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय फिजियोथेरपी शिबिर

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - इयत्ता पहिली ते बारावीच्या जिल्हा परिषद  व खाजगी माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे  व्यावसायिक थेरपी , स्पीच थेरपी, ,संवेदी  एकत्रीकरण, फिडिंग थेरपी ,शारीरिक पुनर्वसन, ग्रुप थेरपी, फिजियोथेरपी शिबिर दिनांक.29/03/2023 ला समावेशित शिक्षण कक्ष स्पर्धा परीक्षा शिक्षण विभाग पंचायत समिती पवनी येथे आयोजित करण्यात आले होते. त्यात पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील मतिमंद ,कर्णबधिर अस्तिव्यंग,सीपी,बहुविकलां ,स्वमग्न अशा दिव्यांग विद्यार्थ्यांना .डॉ. तेजल तुरकर ,क्लिनिकल सायकॉलॉजिकल तज्ज्ञ,नागपूर यांच्यामार्फत थेरपी व शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात आले. प.स.पवनी चे गटविकास अधिकारी लांजेवार ,गटशिक्षण अधिकारी शरदचंद्र शर्मा  ,शिक्षण विस्तार अधिकारी. एन.टी. टिचकुले  तसेच गट-समनव्यक कु.दिपाली बोरीकर  यांनी प्रत्यक्ष भेट देऊन फिजियोथेरपी शिबीराला भेट देऊन उपस्थित सर्व विद्यार्थ्यी व पालकांसोबत हितगुज साधले. शिबीरानंतर डॉ.तुरकर  यांनी सर्व समग्र शिक्षा येथील कर्मचाऱ्यांना  व्यावसायिक थेरपी, फिजियोथेरपी बाबत माहिती सांगितली.
      सदर थेरपी शिबिराचे नियोजन एम .डी .वाहाने  व .आर. ए.लोणारे समावेशित तज्ज्ञ पं.स.पवनी यांनी केले. विद्यार्थ्यांची नोंदणी .जना हेमने,  विना गजभिये, राकेश पारधी विशेष शिक्षक यांनी केली. डॉ.एम.जी.रेहपाडे, वि.सा.व्यक्ती महेंद्र भुरे, . मी शहारे, हिमाल तिबुडे,  भोजराज पडोळे, यांनी तालुका स्तरीय शिबिर सुरळीत व यशस्वी होण्याकरिता सहकार्य केले.
      शिबीरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थी व पालकांना प्रवास भत्ता व  अल्पोपहार, चहा देण्यात आला. अतिशय उत्साहवर्धक व खेळीमेळीच्या वातावरणात फिजिओथेरपी ,व्यावसायिक थेरपी  शिबीर संपन्न झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!