राजर्षी शाहू काॅन्व्हेंटच्या वतीने समर कॅम्पचे व बाल संस्कार शिबिराचे आयोजन....



     
 वरोरा.. जगदीश पेंदाम   
राजर्षी शाहू काॅव्न्व्हेंट येथे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध उपक्रम व बालसंस्कार शिबिराचे समर कॅम्पच्या माध्यमातून   आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून समाजिक कार्यकर्ता धीरज  लाकडे (अध्यक्ष शेषरत्न बहुउद्देशीय संस्था बोर्डा.) तसेच प्रमुख पाहुणे म्हणून हनुमान आंबेकर  (जिल्हा अध्यक्ष गायत्री परिवार), वरोरा तालुका अध्यक्ष महेश कानपिल्लेवार ,यशवंत निमजे सर गायत्री परिवार, तर अध्यक्ष म्हणून सौ.सुनंदा पिदूरकर मुक्ताई बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव व राजर्षी शाहू काॅन्व्हेंटच्या प्राचार्य उपस्थित होते. याप्रसंगी धीरज लाकडे  यांनी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यात शिक्षणासोबतच संस्कार असणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले .हनुमान आसेकर सर यांनी विद्यार्थ्यांना बालसंस्कार कसे केले जातात याबद्दल मार्गदर्शन केले.महेश कानपिल्लेवार सर यांनी व्यायामाचे मानवी जीवनात कसे महत्व आहे हे विध्यार्थ्यांना पटवून दिले . तसेच यशवंत निमजे सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विध्यार्थी कसा असावा या बाबत प्रेरणादायी मार्गदर्शन करून आपले मनोगत व्यक्त केले .सुनंदा पिदूरकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी व बालकांवर चांगले संस्कार होण्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवत आहोत आणी भविष्यातही या प्रकारचे उपक्रम राबविले जातील असे सांगितले कार्यक्रमाचे संचालन साक्षी कुमरे यांनी तर आभार प्रदर्शन विद्या झाडे यांनी मानले...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!