जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेत "शाळा पूर्वतयारी मेळावा संपनन
प्रभात फेरी काढून केले पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा वाढविला उत्साह
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - आज दिनांक. २९ एप्रिल रोजी जिल्हा परिषद केंद्रीय शाळा चिमूर येथे "शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात संपन्न झाला, प्रभात फेरी काढून पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवीला
पाटी न पेन्सिल घेऊ द्या की रं या शाळापूर्व गीताने व घोष वाक्यानी बँड पथकासह मिरवणूक काढून जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रिय शाळा चिमूर येथे मुलांना प्रवेश देत शाळेमध्ये पूर्वतयारी मेळावा घेण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीहरी सातपुते यांचे हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी केंद्र प्रमुख महल्ले यांचे उपस्थित चिमूर शहरातील मुख्य मार्गाने प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरी नंतर शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे उद्घाटन सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याला सुरुवात केली. मेळाव्याचे उद्घाटन श्रीहरी सातपुते यांचे हस्ते करण्यात आले यावेळी मंचावर मुख्याध्यापिका छाया खोब्रागडे. सहायक शिक्षिका सरिता गाडगे भाग्यश्री हिंगे, अश्विनी सातपुते, रुपाली जुमडे. सारिका नागोसे. सोनू बावनकर. निराशा नागोसे. वैष्णवी बावणे. उपस्थित होते. यावेळी सर्व दाखलपात्र विद्यार्थ्यांचे शाळापूर्व तयारी क्रमांक एक विकासपत्रा वरील सर्व कृती विद्यार्थ्याकडून करून घेण्यात आल्या. यावेळी पालक मातासह अंगणवाडी सेविका. विद्यार्थी शिक्षक. शाळा व्यवस्थापन समिती व सर्व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला, कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका छाया खोंब्रागडे, सूत्र संचालन सरिता गाडगे यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!