कॉंग्रेसचा पराभव करीत कॉंग्रेस विजयी

 कॉंग्रेसचा पराभव करीत कॉंग्रेस विजयी



खासदार बाळू धानोरकर यांचे कॉंग्रेसचा पराभव करीत, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकचे अध्यक्ष संतोष रावत यांचे कॉंग्रेसनी मूलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत घवघवीत विजय मिळविला.  दिनांक 29 एप्रिल रोजी संपन्न झालेल्या कृउबासच्या निवडणूकीचा निकाल आज तहसिल कार्यालयात जाहीर करण्यात आला.  संतोष रावत यांनी मूल तालुक्यातील सहकार क्षेत्रातील आपला दबदबा कायम ठेवला.

आज घोषीत झालेल्या निकालानुसार, सहकारी संस्था सर्वसामान्य गटातून राकेश रत्नावार, राजेद्र कन्नमवार, अखिल गांगरेडीवार, घनश्याम येनुरकर, सुनिल गुज्जनवार, किशोर घडसे,  हसन वाढई  सहकारी संस्था मतदारसंघात, संदिप कारमवार, सुमित आरेकर,  सहकारी संस्था  महिला राखीव चंदा कामडी, उषा शेरकी  व्यापारी संघटनेतून अमोल बच्चूवार व अडत्या मधून तोलाराम घोगरे ग्रामपंचायत मतदार संघातून राहुल मुरकुटे, जालींद्र बांगरे, लहुभाऊ कडस्कर, शालीक दहीवले, हमाल मापारी मतदारसंघातून, रमेश वामनराव बरडे विजयी झाले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणूकीची पूर्वतयारी म्हणून संतोष रावत यांनी मागील एक वर्षापासून मोर्चेबांधणी केली होती.  या मोर्चेबांधणीचा त्यांना या निवडणूकीत फायदा झाल्याचे दिसून आले.

संतोष रावत गटाला बाजार समितीची सत्ता मिळू नये यासाठी भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेसचाच दुसरा बाळू धानोरकर यांचे नेतृत्वात माजी आमदार देवराव भांडेकर, माजी जि.प. अध्यक्ष प्रकाश मारकवार, माजी जि.प. उपाध्यक्ष विनोद अहिरकर यांनी तयार होवून त्यांनीही या निवडणूकीत रंग आणण्याचा प्रयत्न केला.  मात्र भारतीय जनता पार्टीने निवडणूकीचा नेमका निकाल काय लागणार हे माहीत असल्यांने, अखेरच्या क्षणी निवडणूकीतून माघार घेतली.  त्यामुळे कॉंग्रेस विरूध्द कॉंग्रस लढत असतांना, भाजपाने बघ्याची भूमिका घेतली.

मूल तालुक्यातील सहकार क्षेत्रात आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत कॉंग्रेसच्या रावत गटाचे प्राबल्य आहे, मात्र या गटाला सुरूंग लावण्यांचे खासदाराच्या ‘त्रिकुटा’चे प्रयत्नच कॉंग्रेसला आणखी कमजोर करतील अशी या निवडणूकीच्या माध्यमातून चर्चा रंगली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!