नाल्याचा उपसा न केल्याने अवकाळी पावसाचे पाणी घरात
तळोधी बा :
आज तळोधी बा. येथे सकाळ पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. येथील बाम्हणी वार्डात राहत असलेल्या नागरिकांच्या घरासमोरील नाल्याचा उपसा न केल्यामुळे गावातील नाल्या द्वारे वाहणारा सांडपाणी साचून अंगणातून घरात घुसल्याने दुर्गंधी पसरली आहे.
ग्रामपंचायत पदाधिकारी वर्गाकडून आता तरी लवकर गावातील नाल्यांचा उपसा करने आवश्यक झालेल्या आहे.
मात्र नाल्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांकडूनही आपल्या परिसरातील नाल्या म्हणून घरातील कचरा लग्नकार्य किंवा कोणतेही मंगल कार्य झाल्यानंतर प्लास्टिकच्या पत्रा आणि प्लास्टिकचे ग्लास वाट्या हा नाल्यात न टाकता गावाबाहेर देऊन टाकायला पाहिजे जेणेकरून असा अचानक आलेल्या अवकाळी पावसाने नाल्या बुजून अख्या गावातील घाण पाणी हा त्यांच्या घर परिसरात पसरणार नाही. गावात जिकडेतिकडे नाल्या भुजल्या असुन नाल्याचा त्वरित उपसा करण्याची मागणी गावकरी वर्गाकडून केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!