भद्रावती येथे बचत गटांच्या सी.आर.पी , डी.आर.पी.ची बैठक संपन्न

उप संपादक
विलास मोहिनकर

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यामधे प्रथमच यशश्री मोटर्स चिमूर तर्फे भद्रावती येथे बचत गटांच्या सी.आर.पी , डी.आर.पी ची बैठक संपन्न झाली. यामध्ये बचत गटांच्या सी.आर.पी च्या महिलांना पापड तयार करण्याच्या मशीन बद्दल ची तसेच विविध प्रकारे रोजगार उपलब्ध करून कसे देता येईल त्याकरिता लागणारी मशीन व त्याकरिता येणारा खर्च नफा आणि तोटा याबाबतची संपूर्ण माहिती देण्यात आली. तसेच यशश्री मोटर्स च्या माध्यमातून लघु उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यास यशस्वी कसे करता येईल कमी खर्चामध्ये जास्त नफा मिळविण्यासाठी यशश्री मोटर्स नेहमी बचत गटांना मार्गदर्शन करीत असते. त्याबरोरच मशीन मध्ये बिघाड आल्यास तत्काळ त्याठिकाणी कामगार ( इंजिनिअर ) पाठवून मशिनमध्ये काय बिघाड आहे ते स्पष्टपणे सांगणे. दुरुस्ती केली जाते.व मशीन करिता राष्ट्रीकृत बँकेतर्फे कर्जाची सुवर्ण सुविधा आणि याबाबत महिलांना मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!