महिला दिनानिमित्त लेख
महिलांनी स्वतःच्या रक्षणार्थ लढ्यासाठी दिलेल्या स्मरणार्थ दरवर्षी 8 मार्च हा दिवस "जागतिक महिला दिवस" म्हणून साजरा केला जातो. एकोणिसाव्या शतका पर्यंत स्त्रिला दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात होती, उपभोगाचे व कष्ट याचे साधन म्हणजे स्त्री असा सर्व समज रुढ होता.
समाजात समाणतेनी वावरणे, संपत्ती वरील अधिकार तसेच शिक्षण, मतदानाचा अधिकार, आपल्यावर होणारा अन्याय, आपले हक्क या बाबत स्त्रियांमध्ये सजगता येवू लागली होती. त्यातूनच स्त्री वादाचा जन्म झाला. स्त्री वाद किंवा फ्रेफोनिजम हा मुळ फ्रेंच शब्द होय.
स्त्री वाद या शब्दाचा उच्चार प्रथम 1792 साली मेरी ओल्सन यांनी केला. दिनांक 28 फरवरी 1909 रोजी न्युयार्क येथे थेलिसा क्राप्ट यांनी केला होता, दिनांक 28 फरवरी 1909 रोजी न्युयार्क येथे थेलिसा मारण केअर यांच्या मार्गदर्शनाखाली "महिला दिन" आयोजित केला होता, परंतु तत्पूर्वी 8 मार्च 1908 रोजी एक विषेश घटना घडली होती. ती अशी, या दिवशी न्युयार्क मध्ये बस्मोदिघातील हजारो स्त्रीया कामगारांनी प्रोतोगाल चौकात जमून प्रचंड मोठे ऐतिहासिक निदर्शने केली होती.
दहा तासाचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या प्रमुख मागण्या होत्या, या मागण्या बरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री पुरुषाला मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणी होती.
अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिया अतिशय प्रभावीत झाली होती. 1910 साली पणगेहट येथे भरलेल्या दुसर्या आंतरराष्ट्रीय दुसर्या समाजवाद महिला परिषदेत 8 मार्च रोजी अमेरिकन कामगार स्त्रियांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 8 मार्च जागतिक महिला दिवस म्हणून स्विकारावा असा ठराव मांडला व तो पास ही झाला.
एकोणिसाव्या शतकात स्त्रीवादी चळवळींनी जोर धरला. त्याच वेळी भारतातही अनेक समाज धुरीनांनी स्त्री वर होणार्या अन्यायाला वाचा फोडली. त्या मध्ये राजा राममोहन राॅय, महर्षी कर्वे, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले, ईश्वरचंद विद्यासागर, रमाबाई रानडे ही नावे विसरून चालणार नाहीत. सतीप्रथा, केशवपण, बालविवाह अशा अनेक वाईट प्रथा बंद करण्याचे यशस्वी प्रयत्न झाले. स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, प्रोढ विवाह, तसेच अनेक विषय समाजासमोर मांडण्यात येवू लागले.
महाराष्ट्रात महात्मा फुले तसेच भारतातील पहिल्या शिक्षिकेचा मान मिळविलेल्या त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचे फार मोठे योगदान आहे.
समाजाचा प्रखर विरोध व त्यातून उद्भवलेल्या अनंत अडचणींना तोंड देत या पतीपत्नीनी शिक्षणाचा पाया महाराष्ट्रात घातला. सन 1902 मध्ये रमाबाई रानडे यांनी "हिन्दु लेडिज सोशल अॅक्ट लिडहरी क्लर्क ची स्थापना केली. तर 1904 मध्ये भारत महिला परिषदेची स्थापना केली होती.
या संघटना महिलांच्या अनेक समस्या व मागण्या याचा पाठपुरावा करू लागल्या, यातूनच स्त्रियांना मतदानाचा अधिकार, मग स्त्री ला निवडणूकीला उभे राहण्याचा अधिकार, अशा सुधारणा सन 1935 पर्यंत होत गेल्या. भारतात मुंबईत येथे 8 मार्च 1943 या दिवसी पहिला "महिला दिवस" साजरा करण्यात आला होता.
8 मार्च 1971 साली पुण्यात महिलांचा फार मोठा मोर्चा काढण्यात आला होता. 1975 हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले. या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने "जागतिक महिला दिवस" साजरा करण्याचे ठरवले. मेरी ओल्सन क्राप्ट यांच्या पासून म्हणजेच 1792 पासून सुरू झालेला लढा आज पर्यंत चालू आहे.
या प्रदीर्घ कालावधीत स्त्रियांना शिक्षणाचा, संपत्तीचा, मतदानाचा असे अनेक अधिकार मिळाले.
आता सर्व जगात पाहता स्त्री ही पुरूषाच्या बरोबरीने काम करते आहे, सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत.
संकलन - सौ. मंगला बोरकुटे
मुल



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!