शिवजयंती निमित्य मुल मध्ये शिवशाही मित्र परिवार तर्फे भव्य शोभा यात्राचे व कार्यक्रमाचे आयोजन.
मुल तालुक्यात 2015 पासून शिवशाही मित्र परिवाराकडून साजरा करण्यात येणारा शिव जन्म उस्तव कोविड काळातील काही नियमांमुळे साजरे झाले नाहीत. परंतु कोविड काळात सुद्धा सामाजिक भान ठेऊन शिवशाही मित्र परवाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक प्रशासनाला कोविडची परिस्थिती मदतिकरीता तत्परता दाखवली.
यात रक्त दान शिबिर आयोजन करणे, बाहेरील राज्यातील येणाऱ्या लोकाची तपासून करून घेणे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे, कोरणा व्यक्तीस दवाखण्यात नेने, तसेच प्रशासकीय अधिकारी तसेच ठाणेदार यांच्या विनंतीला मान देऊन कामात मदत करत.
शिवशाही मित्र परिवार तर्फे शिवजयंती च कार्यक्रम हा दहा दिवस विविध कार्य आयोजन करुन साजरा केल्या जातो यात, रक्त दान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, डोळे तपासणी शिबिर, रुग्णांना फळे वाटप, सोमनाथ येथे अन्न दान , शहर स्वच्छता, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान, तसेच 19 तरखीला भव्य दिव्य शोभा यात्राचे नियोजन करण्यात येते यात शहरातील सर्व नागरिक सहभाग असतात.
या सर्व कार्यक्रमांचे नियोजन नागरिकाच्या लोक सहभागातून होत असून यात कोणत्याही राजकीय पक्षच सहभाग नसतो.
दर वरषी प्रमाणे या वर्षा सुद्धा 19 फरवरीला शोभा यात्रेचे नियोजन कृषी उत्पन्न बाजार समिती इथून करण्यात येऊन गांधी चोकात याची समाप्ती करण्यात येईल.
सर्व नागरिकांना शोभा यात्रेत येण्याचे आवाहन शिव शाही मित्र परिवार करीत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!