आयटीआय मध्ये अल्पमुदती तांत्रिक प्रशिक्षण: ३० जणांना मिळणार विनामूल्य प्रशिक्षण
आयटीआय मध्ये अल्पमुदती तांत्रिक प्रशिक्षण: ३० जणांना मिळणार विनामूल्य प्रशिक्षण
गडचिरोली (प्रतिनिधी)-
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार मार्गदर्शन केंद्र गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली यांच्या वतीने जिल्ह्यातील सुशिक्षित युवकांसाठी अल्पमुदतीचे तांत्रिक ज्ञानावर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे . सदर अभ्यासक्रमासाठी १८ ते ४५ या वयोगटातील तरुण याचा लाभ घेऊ शकतात . सदर अभ्यासक्रम विनामूल्य असून हा उपक्रम औद्योगिक संस्था गडचिरोली येथे ट्रॅक्टर मेकॅनिक हा ३०० तासाचा अभ्यासक्रम दिनांक २० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या अभ्यासक्रमात एकूण ३० जागा असून गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंखे यांनी केले आहे. सदर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर सदर प्रशिक्षित युवकांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन केले जाईल तसेच नोकरीसाठी सुद्धा या कार्यालयाकडून प्रयत्न केले जातील, तरी या संधीचा तरुणांनी लाभ घ्यावा. प्रवेशाबाबत अधिक माहिती साठी गटनिदेशक हरीश ठाकरे यांचेशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!