राशन कार्डधारकांकडून घेतलेले पैसे परत- पब्लिक पंचनामा बातमीची दखल
सावली - काल पब्लिक पंचनामा या पोर्टलवरून "मोफत अन्नधान्याचे लागतात पैसे -पेंढरी सहकारी संस्थेकडून कार्डधारकांची लूट" या मथळ्याखाली बातमी प्रकाशित झाली होती. या बातमीची दखल घेत शिधावाटप दुकानाच्या कर्मचाऱ्याने गावात जाऊन कार्डधारकांचे पैसे परत दिले
सावली तालुक्यातील आदिवासी सेवा सहकारी संस्था तांबेगडी मेंढा या संस्थेकडे पेंढरी, पांढरसराड येथील शासकीय अन्नधान्य वाटपाचे काम आहे. शासनाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत जानेवारी २०२३ पासून एक वर्षापर्यंत मोफत धान्य वाटप करायचे आहे. त्यात नोव्हेंबर व डिसेंबर २०२२ चे धान्य वाटप करायचे असल्यास तेही जानेवारी महिन्यात मोफत वाटप करायचे होते मात्र आदिवासी सेवा सोसायटी पेंढरी येथील शिधावाटप करणारे कर्मचारी दिवाकर चौके हे धान्य वाटप करीत असताना कार्डधारकांकडून मोफत धान्याचे पैसे घेत लूट करित असल्याचे वृत्त पब्लिक पंचनामा पोर्टलवर प्रकाशित करण्यात आली होती. या बातमीची दखल सहकारी संस्थेचे पदाधिकारी व तहसिल प्रशासनाने घेतली व संबंधित कर्मचारी चौके यांना धारेवर धरले. त्यामुळे सदर कर्मचाऱ्याने पांढरसराड येथे जाऊन कार्डधारकांकडून घेतलेली रक्कम परत केली. यामुळे कार्डधारकांनी पब्लिक पंचनामा पोर्टलचे आभार मानले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!