गडचिरोली काँग्रेसच्या वतीने चंद्रपूरात घंटानाद आंदोलन
चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यातील वाघांचा बंदोबस्त करावा या मागणीसह वनविभागाच्या विविध मागण्या घेऊन गडचिरोली काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचे नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे घरासमोर मोर्चाचे आयोजन होते मात्र पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा अडविला.
महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यातील नरभक्षक वाघांचा बंदोबस्त करावा, जंगली हतींचा बंदोबस्त करावा, रानटी डुकरं मारण्याची परवानगी देण्यात यावी, वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना तात्काळ मदत घ्यावी, वनपट्टे देण्यात यावे, सुरजागड येथील अवैद्य वृक्षतोडीची चौकशी करून गुन्हे दाखल करावे, वनविभागामुळे रखडलेले रस्त्यांना तात्काळ मंजुरी द्यावी, सागवान तस्करी रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी, कमलापूर येथील हत्तीचे स्थलांतर थांबवावे, जिल्ह्यातील वनमजुरांवर लावण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावे, जंगली हत्तीमुळे नुकसान झालेल्याना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, वन्यप्राण्यांमुळे पडीत असलेल्या शेतीची २० हजार भरपाई द्यावी, शेतकऱ्यांना चेंलिंग फेंसिंग देण्यात यावे, स्थानिकांना रोजगारासाठी पर्यटन विकास करावे, वनावर आधारित रोजगारासाठी उद्योग सुरू करावे, जिल्ह्यात वनविभागातील रिक्त पदे भरण्यात यावी या मागण्या घेऊन मोर्चा काढण्यात आला.
यावेळी आंदोलनात चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, प्रदेश महासचीव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसाण, प्रदेश सचिव विजय नळे, सावली पंचायत समिती माजी सभापती विजय कोरेवार, सावली बाजार समिती संचालक खुशाल लोडे, मिथुन बाबनवाडे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, महिला अध्यक्ष रुपाली पंदीलवार, गडचिरोली ता. अध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी ता. अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, चामोर्शी ता. अध्यक्ष प्रमोद भगत, वडसा ता. अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, कोरची ता. अध्यक्ष मनोज अग्रवाल, अहेरी ता.अध्यक्ष प्रमोद भगत, काँग्रेस नेते शंकरराव सालोटकर, नेताजी गावतुरे, अतुल मलेलवार, दिवाकर निसार, अनिल कोठारे, अब्दुल पंजवाणी सह हजारोच्या संख्येने शेतकरी, महिला युवक नागरिक यावेळी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!