बचत गटातर्फे विविध कार्येकम सम्पन्न




महिला आर्थिक विकास महामंडळ ,चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात असलेले
मैत्रीण लोकसंचालित साधन केंद्र मुल दीनदयाल अंतोदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगरपरिषद मुल यांच्या संयुकत्त विद्यमाने मुल येथे आज सावित्री जयंतीनिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. बचत गटातील महिलांना त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा म्हणून हे बचत गट दरवर्षी कार्यक्रम आयोजित करीत असतात. या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष त्रिवेणी वस्ती स्तर संघ अध्यक्ष योगिता मारकवार ,प्रमुख अतिथी, व्यवस्थापिका मैंत्रिन सीएमआरसी मेश्राम मैडम, माजी नगरसेविका प्रभा चौथाले ,सामाजिक कार्यकत्या फरजा शेख,महिला पत्रकार कुमुदिनी भोयर ,समन्वयक वानखेडे ताई,समन्वयिका चोके ताई,तसेच नगरपरिषद मुल चे समन्वयक आलोख सर,nulm चे समूह संघटक अमोल फुले सर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भावना मारकवार, नंदिनी कंदावार ,शहनाझ यांनी परिश्रम घेतले.सहायक प्रकल्प अधिकारी श्री रितेश भोयर तसेच सहयोगिनी नलिनी आडपवार यांच्या मार्ग दर्शना खाली असलेले मुल येथील बचत गट नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवित असतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!