स्वस्त धान्य दुकानात मोफत धान्य वाटप
भारपायली प्रतिनिधी
दिनांक 1.1. 2023 पासून एकवर्ष्याच्या कालावधी करता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत असलेले अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांना मोफत वितरित करावयाचे आदेश मान. तहसीलदार यांनी पत्राद्वारे सर्व स्वस्त धान्य दुकान धारकांना कळविण्यात आले होते, त्या अनुषंगाने भारपायली स्वस्त धान्य दुकानदार श्रीकांत बहिरवार यांनी आज पासून मोफत धन्य वाटप सुरू केलेले आहे. चक, मानकापूर,मेटेगावं व भारपायली येथील कार्डधारकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. शासनाने डिसेंबर 2023 पर्यंत मोफत धान्य वाटपाचा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!