सावलीतील आदिवासी वस्तीगृह इमारत अखेर बदलले - आदिवासी संघटनांमध्ये दुमत


सावली - सावली येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वस्तीगृहात संख्येच्या प्रमाणात खोल्या नाहीत, सौचालय व स्नानगृह नाही या भौतिक असुविधेचा अभाव असल्याने व इतर अनेक प्रश्न उपस्थित करून इमारत बदलविण्यासाठी अभाआविप संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत अखेर वसतिगृह दुसरीकडे हलविण्यात आला. तर गोंडवाना गणतंत्र पार्टी यांनी या निर्णयाला विरोध करीत पत्रकार परिषद घेऊन गृहपाल धनराज डबले यांचेवर शंका उपस्थित केली.

       सावली येथील आदिवासी वस्तीगृहातील मुलींच्या संख्येच्या प्रमाणात खोल्या, संडास, बाथरूम अशा भौतिक सुविधेचा अभाव, वस्तीगृह नॅशनल हायवेला लागून असल्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनांचा कर्कश आवाज, दोन्ही बाजूला बियर बार असल्यामुळे अनेकदा दारुड्यांकडूनही त्रास, पार्किंग सुविधा नाही, खेळाचे मैदान नाही, अशा असुविधांमुळे गैरसोय होत असल्याने सदर मुलींचे वस्तीगृह इमारत बदलवून दुसऱ्या ठिकाणी सोय करण्यात यावी अशी मागणी करीत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदोलनाची दखल घेत अखेर आदिवासी प्रकल्प अधिकारी मृगनाथन  यांनी वसतिगृह दुसरीकडे हलविले.
     मात्र वस्तीगृह बदलविण्याचा निर्णय येथील गृहपाल धनराज डबले यांच्या हेकेखोर पणामुळे होत असल्याचा आरोप गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या पदाधिकारी यांनी केला आहे.

"जुने वस्तीगृह इमारत हे शासकीय नियमानुसार ज्या सुविधा मुलींना मिळायला पाहिजे होते त्या पद्धतीचे नव्हते. कोणत्याच दारू दुकानाजवळ वस्तीगृह ठेवता येत नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालक व नियमानुसार इमारत बदलण्याची मागणी केली होती. त्यामुळे अखिल भारतीय विकास परिषद संघटनेच्या मागणीला यश आले आहे.
अतुल कोडापे
युवाध्यक्ष अभाविप चंद्रपूर जिल्हा

"मुलींच्या वस्तीगृहात महिला गृहपाल ऐवजी धनराज डबले हे पुरुष गृहपाल आहेत त्यामुळे मुली असुरक्षित आहेत. इमारत बदलण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांना भडकावून डबले यांनी प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे त्यांना हटविण्यात यावे."
बापू मडावी
जिल्हाध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!