मोफत अन्नधान्याचे लागतात पैसे - पेंढरी सहकारी संस्थेकडून कार्डधारकांची लूट
सावली तालुक्यातील आदिवासी सेवा सहकारी तांबेगडी मेंढा या संस्थेकडे पेंढरी, पांढरसराड येथील शासकीय अन्नधान्य वाटपाचे काम आहे. शासनाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत जानेवारी २०२३ पासून एक वर्षापर्यंत मोफत धान्य वाटप करायचे आहे. त्यात नोव्हेंबर व डिसेंबर २०२२ चे धान्य वाटप करायचे असल्यास तेही जानेवारी महिन्यात मोफत वाटप करायचे आहे असे पत्र तहसीलदार सावली यांनी स्वस्त धान्य दुकानदारांना ५ जानेवारी २०२३ चे पत्राद्वारे कळविले आहे. मात्र आदिवासी सेवा सोसायटी पेंढरी येथील शिधावाटप करणारे कर्मचारी दिवाकर चौके हे धान्य वाटप करीत असताना कार्डधारकांकडून मोफत धान्याचे पैसे घेत लूट करित असल्याचा प्रकार सुरू असल्याचे पांढरसराड येथील कार्डधारकांनी आमचे प्रतिनिधीजवळ व्यक्त केले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून सदर दुकानावर महाराष्ट्र अनुसूचित वस्तू (वितरणाचे विनियमन) आदेश १९७५ अंतर्गत अटी व शर्थीचे उल्लंघन प्रकरणी दुकानाचे प्राधिकरण रद्द करतील काय? जीवनावश्यक अधिनियम १९५५ चे कलम ३,७ अंतर्गत गुन्हा दाखल करतील काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!