नवीन वर्षाच्या मुहूर्तावर बळीराजाची आत्महत्या
प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल
मारोडा येथे नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर बळीराजा ने केली आत्महत्या रवींद्र गोपालाजी बोरुले वय 50 असे मृतकाचे नाव आहे. रवींद्र हा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच दुपारी चारच्या दरम्यान घरून गेला रात्री दहा वाजले तरी तो घरी परतला नाही म्हणून घरच्यांनी शोधाशोध केली असता मृतक रवींद्र हा गळफास घेतलेल्या अवस्थेत साडे दहाच्या सुमारास शेतामध्ये आढळला. विश्वासनीय व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार मृतक हा नापिकीमुळे आणि कर्जामुळे आत्महत्या केल्याचे कळले. रवींद्र च्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आहे आणि बराच मोठा बोरुले परिवार आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!