हर घर शिक्षा उपक्रमांतर्गत नोटबुक व पेनचे वाटप
तळोधी बा.;
येथून जवळच असलेल्या नागभीड तालुक्यातील चारगाव चक, चारगाव माना व पुलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना जनकल्याण बहुउद्देशिय शिक्षण संस्था नवरगाव तर्फे नोटबुक व पेनचे वाटप करण्यात आले.
पालकांच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंपासून वंचित रहावे लागते. त्यामुळे बरेचदा विद्यार्थी शालेय प्रवाहापासून दूर जातात. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन जनकल्याण बहुउद्देशिय शिक्षण संस्था नवरगावच्या 'हर घर शिक्षा' या उपक्रमांतर्गत सदर वस्तूंचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रीत करुन ज्ञानार्जन करावे, त्यासाठी लागणा-या शालेय वस्तू संस्थेकडून वारंवार पुरवल्या जातील, असे आश्वासन संस्थेच्या सचिव मनीषाताई बारापात्रे यांनी दिले. या वाटपाप्रसंगी संस्था सचिव मनीषाताई बारापात्रे, सदस्य संकेत बारापात्रे, उत्कर्ष बारापात्रे, मुख्याध्यापक भेंडारे, संजय डफ, झाडे, सहायक शिक्षक गड्डमवार, पाकमोडे, मडावी, चंद्रशेखर गायकवाड,सुरेश बोरकर, सुरेश खोब्रागडे, विलास तोडासे उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!