ट्रॅक्टर - दुचाकी अपघातात युवक ठार
नांदेड झाडबोरी रस्त्यावरील घटना.
तळोधी (बा.)
तळोधी बाळापुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नांदेड झाडबोरी - नवरगाव रस्त्यावर आज झालेल्या दुचाकी ट्रॅक्टर अपघातात नांदेड येथील आपल्या नातेवाईकाकडे खतण्याच्या कार्यक्रमाकरिता आलेला जाम येथील युवक हा नवरगाव येथे कार्यक्रमाचा सामान घ्यायला जाऊन परत येत असताना , ट्रॅक्टर दुचाकी धडकेत झाडबोरी जवळील नांदेड पाणीपुरवठा टाकी च्या जवळ झालेल्या अपघातात युवक अलीम रतन शेख (22 ) हा जागीच ठार झाला. तर दुचाकी चालक समसेद झोनू शेख, नांदेड हा किरकोळ जखमी झाला.
हा अपघात ट्रॅक्टर क्रमांक *एम एच 34 एल 4929* हा ईश्वर गहाणे, नवरगाव यांच्या मालकीचा ट्रॅक्टरने धडक देऊन नंतर डॉक्टर चालक ट्रॅक्टर घेऊन फरार झाला. समोरील तपास ठाणेदार बी. आर. शेंडे यांच्या मार्गदर्शनात तळोधी पोलीस पूढील तपास करीत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!