राज्यस्तरीय शालेय योगासन स्पर्धेसाठी खुशी नागपुरे ची निवड
तालुका - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )
वरोरा : - लोक शिक्षण संस्था वरोरा द्वारा संचालित लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय वरोरा इयत्ता बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थीनी खुशी रविंद्र नागपूरे हिची राज्यस्तरीय शालेय योगासन स्पर्धेसाठी नुकतीच निवड झाली. राज्यस्तरीय शालेय योगासन स्पर्धेत खुशी नागपुरे ही नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालाय वरोरा येथील इयत्ता बारावीच्या खुशी नागपूरे , अंजली बरडे आणि तृप्ती धवणे ह्या तीन विद्यार्थीनींनी नागपूर येथे आयोजित विभाग स्तरीय शालेय योगासन स्पर्धेत सहभाग घेतला . यापैकी खुशी नागपुरे ही राज्यस्तरीय शालेय योगासन स्पर्धेसाठी पात्र ठरली. नागपूरच्या मानकापूर येथील विभागीय क्रीडा स्टेडियममध्ये सदर स्पर्धा पार पडली. या स्पर्धात लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय वरोराच्या खेळाडूंनी चंद्रपूर जिल्हयाचे प्रतिनिधित्व केले .मार्गदर्शक शिक्षक महेश अशोक मोरे यांनी वेळोवेळी खुशी नागपूरे हिला योगासना विषयीचे मार्गदर्शन केले.खुशी नागपूरे आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक शिक्षक महेश अशोक मोरे, आई वडील , प्राचार्य व समस्त शिक्षक वृन्दांना देत आहे. लोक शिक्षण संस्था वरोराचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष श्रीकृष्ण घड्याळ पाटील आणि समस्त संचालक मंडळ, प्राचार्य दिपक नवले, पर्यवेक्षक राहुल राखे, वर्गशिक्षक प्रा.आनंद मेहता , राघवेंद्र अडोणी , डॉ. प्रशांत खुळे, सारंग धनेगावकर , गणेश मुसळे आणि समस्त शिक्षक बंधू - भगिनी व कर्मचारी वृन्दांनी खुशीचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!