शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार
सावली(प्रतिनिधी)
तालुक्यातील निलसनी पेठगाव येथील शेतात गेलेला शेतकरी वाघाच्या हल्यात ठार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. शे कैलास लक्ष्मन गेडेकर वय ४७ वर्ष असे मृतकाचे नाव असून निलसनी पेठगाव येथील रहिवाशी होता सावली वन परिक्षेतत्रा अंतर्गत येत असलेल्या उपवन क्षेत्र व्याहाड खुर्द परिसरातील निलसनी पेठगाव येथील कक्ष क्र २०१ हे शेत जमीनी लगतचे क्षेत्र असून या भागात मोठ्या प्रमाणात वन्य जीवांचे वावर आहे. धानपिकाची सिजन असल्याने अनेक शेतकरी परिवारा सह शेतात काम करीत आहेत. काल शेतात गेला मात्र परत आला नसल्याने नातेवाईकांनी शोध सुरू केले. दुसऱ्या दिवशी शेता लगत असलेल्या वनात त्याचा शोध घेतला असता वाघाच्या हल्ल्यात शरीराचे अवयव गायब असलेल्या अवस्थेत आढळून आले. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन शव शवविच्छेदन करीता पाठविण्यात आले आहे. याघटनेमुळे शेतकरी घाबरलेले असून वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!