लोकविद्यालय तळोधी(बा) येथे गणित दिन विविध उपक्रम राबवून साजरा.



 
तळोधी(बा):
    दी रूरल एज्युकेशन सोसायटी ब्रम्हपुरी सन 1960 द्वारा संचालित लोक विद्यालय तळोधी(बा) येथे गणितीतज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस "गणित दिन" म्हणून शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक पि. यु.गिरडकर,प्रमोद पाकमोडे, रविंद्र निनावे यांच्या  प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला..!!
          प्रथमता गणितीतज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला प्र.मुख्याध्यापक पि. यु.गिरडकर यांनी पुष्पमाला अर्पण करीत आदरांजली अर्पण केली.. 
  पदवीधर शिक्षक संतोष नन्नावार यांनी मार्गदर्शनात सांगितले की,शालेय जीवनात बरेच जणांना कठीण वाटणारा विषय म्हणजे गणित, गणिताची चाचणी म्हटलं कि तेव्हा प्रत्येकाच्या अंगावर शहारे यायचे, पण तेच शालेय जीवनात कधी पदवीच्या मुलांना शिकवले का? नाही ना ! पण आपल्याच देशाच्या एका महान व्यक्तिमत्वाने शाळेत असताना पदवीच्या मुलांना गणित शिकवले, ते व्यक्तिमत्व म्हणजे श्रीनिवास रामानुजन.संपूर्ण जगाला 3500 गणितीय सूत्रे देण्याचे श्रेय श्रीनिवास रामानुजन यांना जाते.विविध गणिती सूत्रे,वर्गमूळ यांच्या क्लुप्त्या यावेळी सांगण्यात आले.
    यावेळी  वर्ग ५ ते १० च्या विद्यार्थ्यांनी गणित विषयाची आवड निर्माण होण्यासाठी गणितीय प्रश्नमंजुषा स्पर्धा विद्यालयात घेण्यात आली.यातील यशस्वी विद्यार्थीनी कु.निता जेंगठे,कु.अनुष्का आमले,कु.खुशी चौधरी या विद्यार्थ्यांनीना पारितोषिक गणित शिक्षिका सौ.ज्योती मोहूर्ले यांच्या वतीने पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
     यावेळी  एस.व्ही.बालमवार,सोनल उंबरकर,अजय सगळाम,ज्योती मोहूर्ले,स्नेहा भरडकर,कविता नागपूरकर इतर पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संतोष नन्नावार यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!