आमदार विजय वडेट्टीवार यांची मानव-वन्यजीव संघर्षाबाबत बैठकित उपाययोजना करण्याच्या सूचना मृतकाचे घरी भेट देत कुटुंबियांना केली आर्थिक मदत



सावली (प्रतिनिधी)
 तालुक्यात आठवडाभरात नीलसनी पेठगाव, रुद्रापूर व खेडी येथे वाघाच्या हल्यात तीन निर्दोष व्यक्तींचा बळी गेला. यामुळे लोक भयभीत झालेले असून सामान्याचे जीवन विस्कळीत झाले आहे. वाघाच्या दहशतीमुळे घराबाहेर निघणे कठीण झाले. शेतकरी शेतात जाऊ शकत नाही,  विदयार्थी शाळेत जाऊ शकत नाही त्यामुळे वाघाला जेरबंद करा, वाघ असलेल्या गावात 20 कार्यकर्त्यांची टीम तयार करून गस्त वाढवा, जंगलाभोवती कंपाउंड व शेतकऱ्यांना सौर तार पुरवठा करा व तसे प्रस्ताव बनवा अशा सूचना वनाधिकारी यांना आमदार विजय वडेट्टीवार यांनी केल्या. बैठकीत मुख्य वनसंरक्षक  लोणकर, उपवनसंरक्षक खाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी विरुटकर, नायब तहसीलदार सागर कांबळे व वनकर्मचारी उपस्थित होते.
     वाघाच्या हल्यात मृत पावलेल्या कुटुंबाचे घरी जाऊन सांत्वना केली. रुद्रापूर येथील बाबुराव कांबळे, खेडी येथील स्वरूपा येल्लटीवार व निलसनी पेठगांव येथील कैलास गेडेकर हे  वाघाच्या हल्यात मृत पावले यांच्या कुटुंबांना शासनाची 5 लाखाची मदत व आपलेकडून आर्थिक मदत केली. यावेळी माजी जिप सभापती दिनेश चिटणुरवार, माजी जिप उपाध्यक्ष संदीप गड्डमवार,  माजी सभापती विजय कोरेवार, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने, सावलीच्या नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे, शहराध्यक्ष विजय मुत्यलवार, नितीन दुव्वावार, राकेश गड्डमवार, पुरषोत्तम चुदरी, निखिल सुरमवार ,मुन्ना स्वामी,आशिष मनबत्तू लवार ,चक्रधर दुधे, सुनील पाल आदी कार्यकर्ते उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!