आधी गटाराचे काम करा अन्यथा रस्त्याचे काम बंद गावकऱ्यांची मागणी



मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यातील फिस्कुटी गावात ग्राम पंचायत तर्फे सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. परंतु रस्त्याच्या बाजूला नाल्याचे गटारीचे काम न करता फक्त सिमेंट रस्त्याचे कामे सुरु केल्याने गावातील लोकांनी विरोध व्यक्त केले. पहिले सान्डपान्याचे गटाराचे काम करावे अन्यथा सिमेंट रस्त्याचे काम बंद पाडल्या जाणार अशा इशारा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष सुमीत सुरेशराव समर्थ , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते अनिकेत  संजयपाटील मारकवार, शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, महेश जेंगठे, बंडू साकलवार ,युवा नेते विकास गुरनुले यांच्या नेतृत्वाखाली गावक-यानी आज उ. वि. अभियंता सार्वजनिक बांधकाम मूल यांना कडे निवेदन देण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!