मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन तर्फे समुदाय समन्वयकांची दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न
मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन तर्फे समुदाय समन्वयकांची दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न
मॅजिक बस संस्थेचे वरीष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका समन्वयक कु.निकिता ठेंगणे यांच्या नियंत्रणात चालत असलेल्या जीवन कौशल्य उपक्रम मागील काही वर्षांपासून अविरतपने राबविला जात आहे.. त्याच अनुषंगाने गावागावात काम करणारे समुदाय समन्वयक यांची दोन दिवसीय कार्यशाळा दिनांक 21 डिसेंबर ते 22 डिसेंबर रोजी तहसील कार्यालय मुल येथे घेण्यात आली.
या ट्रेनिंगमध्ये स्वयंसेवक कसा असावा,मॅजिक बस इतिहास,ध्येय,दृष्टिकोन, समूदाय प्रतिबद्धता धोरण, भारतीय संविधान प्रस्तावना,हक्क व अधिकार,कर्तव्य, जबाबदाऱ्या,बाल संरक्षण आणि संरक्षण धोरण तसेच गावातील समस्या शोधून त्या समस्या कशा पद्धतीने सोडवणार यासाठी प्रात्यक्षिक घेऊन त्यांना त्यांच्या गावातील असलेल्या समस्या सोडविण्याचा कार्य देण्यात आले.
या प्रशिक्षणात मुल तालुक्यातील गावातील समूदाय समनव्यक मोठ्या प्रमाणत उपस्थित होती हे प्रशिक्षण निकिता ठेंगणे तालुका समनव्यक मुल,शुभांगी रामगोनवार ,दिनेश कामतवार,संदेश रामटेके,सोनम लाडे,मंजुषा कुरेकर शाळा सहायक अधिकारी,मुल यांनी घेतले..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!