सावली तालुक्यात ग्रामपंचायत काँगेसच्या हाती गेवरा ग्रामपंचायत मध्ये ७ पैकी ७ कॉंग्रेसचे सदस्य विजयी तर सरपंच भाजपचा



सावली (प्रतिनिधी)
सावली तालुक्यात बोथली, नवेगाव तुकुम व गेवरा बूज ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले असून एकूण २३ सदस्यांच्या जागेवर काँगेसचे १९ तर भाजपचे ४ उमेदवार विजयी झाले.  सरपंच पदाचे ३ जागा पैकी काँगेसचे २ बोथलीचे सुशील नरेड्डीवार, नवेगाव तुकमचे निता ठाकरे तर गेवरा तुकुमचे मोहन चनांवार भाजप सरपंचपदी विजयी झाले आहे.
गेवरा बूज ग्रामपंचायत ७ जागा सदस्यांकरिता तर १ जागा सरपंच करीता होती.  थेट सरपंच निवड असल्याने काँग्रेसचे सर्व सदस्य निवडून आले असतांना सरपंच मात्र भाजप पक्षाचे मोहन चनावार निवडून आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!