पंचवीस सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभेतील 110 लोकांचा अभ्यास दौरा संपन्न. रिवार्ड्स संस्थेचा पुढाकार




तळोधी बा:
        समाज प्रगती सहयोग संस्था धारणी आणि रिवार्ड्स मल्टीपर्पज सोसायटी नागभीड यांच्या संयुक्त विद्यमाने नागभिड तालुक्यातील वनहक्क प्राप्त ग्रामसभाचे सक्षमीकरण आणि सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीच्या प्रतिनिधीची क्षमता बांधनी  च्या उद्देशाने गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील धमदितोला, पाऊलझोला मध्ये  अभ्यास दौरा  संपन्न झाला.
 ज्या गावात वनहक्कबद्दल जनजागृती झाली आहे. आणि यशस्वीरित्या गावाचा विकास होऊन गावातील लोकांना रोजगार प्राप्त झालेला आहे अशा गावांचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र च्या शेवटच्या टोकावर असलेल्या  गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील 'धमदी टोला' येथे सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती मधील पंचवीस गावातील सदस्यांना नेण्यात आले.
   अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी अधिनियम 2006 च्या कलम तीन एक ग नुसार ग्रामपंचायत नसलेल्या गावांना सर्व मतदारांच्या मिळून बनलेल्या सभेस ग्रामसभा म्हणून कायदेशीर मान्यता मान्यता देऊन या ग्रामसभांना सामूहिक वन अधिकार मान्यता देणारे अधिकार अभिलेख देण्यात आलेले आहेत.  व जल स्त्रोतांचे संरक्षण करायचे आहे. रोपवाटिका, वनीकरण बंधारे, तलाव,शेतीचे बांध बंदिस्ति, भूतलावावरील पाणीसाठे वाढतील शेतीची उत्पन्न वाढेल  व आर्थिक विकास होईल या दृष्टीने रिवार्ड्स संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुणवंतजी वैद्य यांनी वनहक्काबद्दल जनजागृती करून 25 गावात वनहक्क प्राप्त गावामध्ये सामूहिक वनहक्क  व्यवस्थापन समिती गठित करून त्यामधील सदस्यांना अभ्यास दौऱ्यासाठी नेण्यात आले. 
तालुक्यात 54 गावांना वनहक्क प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 25 गावात रिवॉर्ड्स संस्थेच्या पुढाकाराने वनहक्कची योग्य रित्या अमलबजावणी व्हावी यासाठी सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समित्या गठीत करण्यात आल्या.
रिवॉर्ड्स संस्थेच्या मार्गदर्शनाने तालुक्यामध्ये 11 गावे या चालू वर्ष्यात स्वतंत्ररित्या हिरवा तेंदू संकलन करणार आहेत तर 14 गावांनी ग्रामसभा घेऊन चिंनंकीत कामाना मंजुरी देऊन ग्रामपंचायत कार्यलयाना सादर केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!