सावली तालुका क्रीडांगण राम भरोसे - तालुका क्रीडा अधिकारी यांचे दुर्लक्ष- पुन्हा अतिक्रमणाच्या विळक्यात जाण्याची शक्यता

सावली तालुका क्रीडांगण राम भरोसे - तालुका क्रीडा अधिकारी यांचे दुर्लक्ष-
पुन्हा अतिक्रमणाच्या विळक्यात जाण्याची शक्यता
सावली (प्रतिनिधी)
युवकांना विविध शारीरिक चाचणीच्या माध्यमातून पोलीस, सैनिक अशा भरतीमध्ये सहभाग घेता यावा, क्रीडा क्षेत्रांत भरारी घेता यावी यासाठी तालुका स्तरावर क्रीडांगण ची व्यवस्था केली जाते मात्र याकडे तालुका क्रीडा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने क्रीडांगणाकरिता असलेले मैदानही अतिक्रमणाच्या विळख्यात जाण्याची शक्यता आहे.
वर्षभर शारीरिक मेहनत केल्यानन्तर युवकांना सैनिक, पोलीस व विविध क्रीडा क्षेत्रात जाण्याची संधी मिळते मात्र ही संधी प्राप्त करण्यासाठी सावली तालुक्यात मैदान व क्रीडा संकुलच नसल्याने युवकांची निराशा होत आहे. तालुका क्रीडा संकुलसाठी चकपिरंजी येथील सर्व्हे नंबर 419 व 420 ही सरकारी जमीन आरक्षित करण्यात आली आहे. या जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले होते मात्र मोजणी करून हद्द कायम करण्यात आली व अतिक्रमण हटविण्यात आले. मैदानाच्या चारही बाजूस संरक्षण भिंत बांधल्यास आणखी अतिक्रमण होणार नाही व क्रीडा संकुलाचे बांधकामासाठी जागा कायम राहील. परंतु याबाबीकडे तालुका क्रीडा अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याने हे मैदान अतिक्रमणाच्या विळख्यात जाईल अशी भीती व्यक्त केल्या जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!