दोन विभागाच्या समन्वयाअभावी मूलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह!

दोन विभागाच्या समन्वयाअभावी मूलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह!

पोलिस विभाग आणि नगर परिषद प्रशासन यांचेतील समन्वयाअभावी मूल वासीयांची सुरक्षा धोक्यात आली काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.



मूल शहराच्या आणि शहरवासीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लाखो रूपये खर्चुन ​महत्वाचे ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. यासोबतच गांधी चौकातील वर्दळीमुळे अपघात होवू नये यासाठी वाहतूक सिग्नल लावण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाहतूक सिग्नल हे कायमच चालू कमी आणि बंद अधिक असतात.  यामुळे मूल शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या या उपाययोजनेचे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.

सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा उपयोग आणि कार्यान्वय मूल पोलिसांकडे आहे.  या कॅमेराची देखभाल व दुरूस्ती नगर परिषदेकडे आहे.  कॅमेरे बंद झाले तर पोलिसांना अडचण, मात्र दुरूस्तीची व देखभालीची व्यवस्था नगर पालिकेकडे असल्यांने, त्यांचे लेखी हे काम 'प्रायरेटी'चे नाही. त्यामुळे या दोनही विभागात पाहीजे तेवढा समन्वय नसल्यांने, शहराचा तिसरा डोळा कायमच आंधळा राहत आहे.  हीच परिस्थिती वाहतूक सिग्नलची आहे.  सुरळीत वाहतूक ही पोलिस विभागाची जबाबदारी, यासाठी गांधी चौकात वाहतूक सिग्नल लावण्यात आले, मात्र याचीही देखभाल दुरूस्ती नगर परिषदेकडे आहे.  त्यामुळे ही व्यवस्थाही सिसिटीव्ही प्रमाणेच झाली आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने दोनही व्यवस्था पोलिसांकडेच असणे योग्य आहे, मात्र या व्यवस्थेच्या संचालनासाठी आवश्यक असलेले देखभाल दुरूस्तीची निधीची तरतूद पोलिस विभागाकडे नसल्यांने, मूल वासीयांची सुरक्षा सध्यातरी वार्यावर आहे.  ही व्यवस्था सुरळीत होण्यांसाठी सिसिटीव्ही, वाहतूक सिग्नल देखभाल व दुरूस्तीचा निधी पोलिसांकडेच राहणे योग्य राहील असे मत आता व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!