वाघाच्या भीतीमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करा..

वाघाच्या भीतीमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करा..

भाजयुमो जिल्हा महामंत्री सचिन नरड यांची मागणी..

शेगाव.. जगदीश पेंदाम
परिसरातील ग्रामीण भागात दररोज दिवसा वीजपुरवठा सुरू राहत नसल्याने रब्बी पिकांच्या पेरणीची कामे खोळंबली आहे. वाघासह इतर जंगली प्राण्यांच्या भीतीमुळे रात्री शेतात पाणी करणे कठीण होत असल्याने आठवड्याचे सर्व दिवस दिवसभर वीजपुरवठा सुरू ठेवावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने भारतीय जनता युवामोर्चा जिल्हा महामंत्री सचिन नरड यांनी केली आहे.
शेतकऱ्यांचा रब्बी पिकांचा हंगाम चालू असून, वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांची हरभरा पेरणीची लगबग सुरू आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांची हरभरा पेरणी जवळपास झालेली आहे. परंतु, बागायती शेतकऱ्यांची हरभरा पेरणी अजून व्हायची आहे. यावषी जास्त पाऊस पडल्यामुळे शेतजमिनी कडक आल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांना जमिनीला संचित करून पेरल्याशिवाय पर्याय नाही. शेगाव (बु) सह तालुक्यातील इतर परिसर जंगलव्याप्त आहे. या भागात वाघासह इतर जंगली प्राण्यांची दहशत आहे. यामुळे शेतकरी रात्रपाळीत जमिनीला पाणी करू शकत नाही. महावितरणकडून आठव्यातील तीन दिवस आठ तास विद्युत पुरवठा केल्या जातो. त्यातही दिवसात चार ते पाच वेळा विद्युतचा लपंडाव सुरू असतो. परिणामी शेतकऱ्यांना फक्त पाच ते सहा तास विद्युत मिळते. हरभरा पेरणीचा हंगाम जाऊ नये म्हणून काही शेतकरी रात्री होणाऱ्या विद्युत पुरवठ्यात शेतात जाऊन पाणी करतात. शेतकऱ्यांना रात्री पाणी करताना वाघ तसेच जंगली जनावरांपासून धोका आहे. वाघांचा वावर तसेच सर्पदंश यामुळे पूर्वी अनेक शेतकऱ्यांचे जीव गेले आहे. आताही जाऊ शकतात अशी भीती आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना रब्बी हंगामात आठवड्यातील सर्व दिवस दिवसाला बारा तास विद्युत पुरवठा द्यावा अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री सचिन नरड यांनी केली..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!