परप्रांतीयांच्या टरबूज लागवडीमुळे अंधारी नदीवर पाणी टंचाईची झळ
मूल प्रतिनिधी
मुल तालुक्यातील सुशी-नलेश्वर नदी घाटावर अंदाजे ५० एकरहून अधिक जागेवर परप्रांतिय (छत्तीसगड) येथील लोकांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या अतिक्रमीत वनजमिनीवर टरबूज लागवड केलेली असुन यासाठी अवैध लाईन चोरी करून दिवस रात्र नदिच्या पाण्याचा उपसा करीत आहेत. पोंभूर्णा मुल,तालूक्यात बारमाही वाहणारी नदी नसल्यामुळे जानेवारी महीण्यात या भागात मोठी पाणी टंचाई निर्माण होत असते. टरबूज लागवडीत होत असलेली पाणी चोरी व विज चोरीवर अंकूश लावणे गरजेचे आहे. काही दिवसांत या नदिवर अवलंबून असणाऱ्या गावांना पाण्याच्या टंचाईचा मोठा सामना करावा लागणार आहे. पाणी टंचाई पुढे जाऊन भयंकर रूप धारण करू शकेल हि गोष्ट नाकारता येणार नाही. ठेक्या पद्धतीने टरबूज लागवडी करणाऱ्या छत्तीसगडी व्यक्तींवर कार्यवाही करावी हि नम्र विनंती.
अंधारी नदी बचाव कार्यात आपला सहकार्य अपेक्षित आहे.आपल्याकडून सदर प्रकरणात कार्यवाही करण्याच्या सहकार्याच्या अपेक्षेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!