नागभीड तालुक्यातील अनेक गावात बालविवाह प्रतिबंधक जनजागृती दिप फेरी कार्येक्रम

नागभीड तालुक्यातील अनेक गावात बालविवाह प्रतिबंधक जनजागृती दिप फेरी कार्येक्रम 
  तळोधी (बा.)                                                       
    कैलास सत्यार्थी फाऊंडेशन नवी दिल्ली पुरस्कृत  बालविवाह प्रतिबंधक जनजागृती दिप जलाओ अभियान नोबल पारीतोषीक विजेते  कैलास सत्यार्थी यांच्या प्रेरणेतून 
                     चंद्रपूर जिल्ह्यातील  नागभीड तालुक्यातील २५ पेक्षा अधिक गावांमध्ये 'स्नेहल ज्ञानसागर शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद: चे प्रतिनिधी अरुण बारसागडे  यांचे मार्गदर्शनाखाली  'बालविवाह प्रतिबंधक दिपजलाओ  रैली' चे आयोजन करण्यात आले. 
   या कार्यक्रमात गावातील  सरपंच, पोलीस पाटील, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी शिक्षिका, अंगणवाडी सेविका, बचतगटांचे पदाधिकारी, महीला सदश्य, तरूण मुलेमुली, अनेक शाळकरी मुले, व गावांतील प्रतिष्ठीत व्यक्तींना सामावून घेण्यात आले.
'बालविवाह प्रतिबंधक दिपजलाओ रैली: चे प्रत्येक गावातील मुख्य रस्त्यां वरून आयोजन करण्यात आले, बालविवाह हा देशावरील कलंक असून तो नष्ट झालाच पाहीजे  या आत्मविश्वासांने ग्रामस्थ या रैलीत हातामध्ये जळती मेणबत्ती, बालविवाहाचे संदेश देणारे रंगीत पोस्टर्स, तसेच  नोबल पारीतोषिक विजेते आदरणिय कैलासजी सत्यार्थी यांचा संदेश पत्रके आणि बैनर्स घेवून सहभागी झाले होते,
     रैलीत *"आगे बढ़ेंगे और जितेंगे!", "बालविवाह है कुप्रथा है,  बेटी के लिए एक विपदा है! " कच्ची उम्र में मत करो ब्याह, दोनो का जिवन होगा तबाह!","गाव गाव पहूचना है, बालविवाह रुकाना है!"* या सारख्या अनेक घोषणा दिल्या . तर गावातील चौकाचौकात गावक-यांना, *बालविवाह करू नका, मुलींना शिकू द्या* अशी प्रतिज्ञा देण्यात आली.   इतकेच नव्हे तर *आम्ही बालविवाह समारंभात सहभागी होणार नाहीत व बालविवाह थांबविण्यासाठी पुर्ण प्रयत्नशील होवू, बालविवाहाची माहीती मिळाल्यास गावातील पोलीस पाटील, पोलीस विभाग व बालसंक्षक्षण कक्षाला कळवू* अशीही शपथ देण्यात आली.
        चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यातील बोंड,राजोली, येनोली, सोनूली,  इ. गावात या रैली चे आयोजन करण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!