नांदेड येथील हत्याच्या आरोपीस आजन्म कारावास, सत्र न्यायालयाचा निकाल.

नांदेड येथील हत्याच्या आरोपीस  आजन्म कारावास,  सत्र न्यायालयाचा निकाल.
तळोधी (बा.)
           पोलीस स्टेशन  तळोधी (बा.)अंतर्गत नांदेड येथे अडीच वर्षांपूर्वी २४/५/२०२० ला सकाळी अकरा वाजता नांदेड येथील गोपाळ पुरी वरील महिला मंगला रमेश राऊत वय ३२ वर्षे हिचा तिच्याच घरी अनैतिक संबंधातून चरित्राचा शंशय  व तिच्या कडे पैशाच्या वारंवार मागणी व तिने पैसाच्या पुरवठा न केल्यामुळे  नायलॉन दोरीने गळा आवरून आरोपी नामे मनोज विठोबा मेश्राम वय ३९ याने तिचा राहत्या घरिच खून केलेला होता.
           सदर गुन्ह्यात मृतकाची सासू चंद्रकला रमेश राऊत च्या फर्यादीवरून तात्कालीन सहा.पोलीस निरिक्षक श्री रोषण शिरसाट यांनी ३०२,५०६ भादवी नुसार गुन्हा दाखल करून, प्रथम तपास पो.उप निरिक्षक आकाशकुमार साखरे यांनी केला, नंतर श्री मिलिंद शिंदे उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रम्हपुरी, यांनी संपूर्ण तपास करत सत्र न्यायालय चंद्रपूर येथे दोषारोप पत्र दाखल केला होता. 
             कोर्ट विद्यमान श्री भालचंद्र साहेब अतिरिक्त सत्र न्यायालय चंद्रपूर, यांच्या न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने आज न्यायालयाने साक्ष पुराव्यानिशी सदर गुन्ह्यात आरोपी मनोज विठोबा मेश्राम यास भादवी ३०२ मध्ये आजन्म कारावास व ५००० रु.दंड व दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास, व भादवी ५०६ नुसार  ३ महिने सजा व १००० रु.दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास  ही सजा ठोठावण्यात आली. 
         या गुन्ह्य मध्ये सरकार तर्फे श्री संदिप नागापूरे   सरकारी अभिव्यक्ति यांनी  केली. सरकारी पैरवी ना.पो.सी. विजय वाकडे यांनी काम पाहिले.
 सदर निर्णयाचा नांदेड येथील जनतेनी स्वागत केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!