अतिक्रमण धारकांना त्वरित पट्टे देण्यात यावे याकरिता तहसील कार्यालय चिमूर समोर डॉ. सतिश वारजुकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दि.२८.११.२०२२ ला चिमूर  येथे अतिक्रमण धारकांना सरकारी गायरान जमिनीवरील केलेले निवासी अतिक्रमण काढने बाबत ,आंबोली, शंकरपूर, गदगाव, पिटीचुवा ,काग, सेडेगाव अशा अनेक गावातील नागरिकांना तहसील कार्यालय चिमूर येथून घरे पाडण्यासाठी नोटीस पाठवली असता आज तहसील कार्यालय चिमूर समोर डॉ. सतिश भाऊ वारजुकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले व अतिक्रमण धारकांना त्वरित पट्टे देण्यात यावे व त्यांच्यावर केलेली कार्यवाही थांबवावी यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी, चिमूर विधानसभा क्षेत्राचे युवक काँग्रेस अध्यक्ष रोशन भाऊ ढोक,चिमूर शहर काँग्रेस अध्यक्ष अविनाश अगडे, ओबिसी विभाग अध्यक्ष विलास डांगे,माजी बाधकाम सभापती कदिर चाचा शेख, मिडिया प्रमुख पप्पू भाई शेख,अविनाश पाटील,राजू भाऊ दांडेकर,मनोज सरदार, धुरपताताई पाटील,शुभांगी नागदेवते,किरंताई तांबोळे, लताताई भोगे व समस्त गावातून आलेले अतिक्रमण धारक नागरिक उपसथित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!