नांदगाव शाळेत स्वच्छता अभियानाला सुरुवात
सिंदेवाही तालुक्यातील नांदगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, नांदगाव येथे दिनांक ३०/१०/२०२२, रविवार ला 'स्वच्छ शाळा अभियान' राबविण्यात आले. या अभियानाची सुरुवात शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष अरुण सहारे यांनी स्वच्छतेचे प्रतिक झाडू हातात घेऊन या अभियानाची सुरुवात केली. त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा असलेला केरकचरा, झाडाझुडुपांमुळे शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे मत व्यक्त केले. त्यांनी संपूर्ण ग्रामवासियांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. शाळा व्यवस्थापन समिती नांदगावचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवाणे हे या अभियानाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून म. गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भगवान मेश्राम हे उपस्थित होते. त्यांनी शाळेच्या रस्त्यावरील केरकचऱ्याचे अतिक्रमण उचलण्यास भाग पाडणार असल्याचा मनोदय व्यक्त केला. या अभियानाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले जय विदर्भ क्रीडा मंडळ नांदगावचे अध्यक्ष चंद्रशेखर दडमल यांनी रस्त्याच्या दुतर्फाचा परिसर स्वच्छ करणार असल्याचे मत व्यक्त केले. या प्रसंगी श्री गुरुदेव सेवा मंडळ नांदगावचे अध्यक्ष जयदेव चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा प्रतिभा सोनवाणे, सदस्या दुर्गा दहिकर, सदस्य गुलाब चांदेकर, सुरेश बोरकर यांची उपस्थिती होती.
या अभियानाचे संचालन, प्रास्ताविक तथा आभार प्रदर्शन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नांदगावचे मुख्याध्यापक अनिल लोनबले यांनी केले. या अभियानासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!