मूलच्या सरकारी रूग्णालयात किचन रूम मध्ये बालकांवर उपचार
मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात चक्क किचन रूममध्ये लहान बालकांवर उपचार केल्या जात असल्यांचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मूल येथील सामाजीक कार्यकर्ते अॅड. अश्विन पॉलीकर यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.
देशात व राज्यात अनेक रूग्णालयात आग लागण्यांच्या, सिलेंडरचे स्फोट होण्यांच्या घटना अलिकडच्या काळात उघडकीस आल्या आहेत. अशा अपघातात अनेकांना मृत्यू पत्करावे लागले आहे. अशा परीस्थितीत मूल येथील वैद्यकीय अधिकार्यांनी लहानग्या कोवळया जीवांसोबत खेळणे गंभीर बाब असल्यांचे मत आता व्यक्त होवू लागले आहे. या किचन रूम मध्ये पाच बालकांवर उपचार सुरू असून, सोबत त्यांचे पालकही आहेत. किचनही सुरू असल्यांने, उपचारासाठी आलेल्या लहान बालकांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
यासंदर्भात तेथे उपस्थित वैद्यकीय अधिकार्यांनी सांगीतले कि, काही काळासाठी ही व्यवस्था केली आहे. मात्र याच काळात अपघात झाले तर? या प्रश्नावर मात्र ते निरूत्तर झाल्यांची माहिती अॅड. पॉलीकर यानी दिली.
अपघाताच्या शक्यतेशिवाय, किचनचा धूर, अन्न शिजवितांना निघणारी वाफ यामुळेही लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम पडू शकतो, हे लक्षात घेता, किचन रूममध्ये लहान बालकांवर उपचार करण्यांचा निर्णय कोणत्या वैद्यकीय अधिकार्यांनी घेतला याचा शोध घेवून त्यांचेवर कारवाई करावी अशी मागणी अश्विन पॉलीकर यांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!