महसूल अधिकाऱ्यांपेक्षा रेती माफियांची हुशारी घरांपासून असते पहारेदारी
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चिमूर तालुक्यातील अवैध रेती माफियांवर महसूल अधिकारी तसेच पोलीस प्रशासनाचा आशिर्वाद असल्याने रात्री पोलीस गस्तीवर असतांना उमा नदी पासून तर उपविभागीय अधिकारी यांचे घरापर्यंत व मुख्यमार्गावरी ठिक - ठिकाणी अवैध रेती माफियांची पहारेदारी असते.असे असतांना महसूल अधिकारी यांना याची माहिती असते परंतु याबाबत पोलीसांना कळवून पोलिसांच्या स्वाधीन त्यांना दिले जात नाही.चिमूर शहरातील पोलीस स्टेशन मार्फत लावलेली संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असून चिमूर शहरात तसेच तालुक्यामध्ये चोरीचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढत चालले आहे. आठवडी बाजारामध्ये अनेकांचे मोबाईल चोरी गेले. परंतु चोरट्यांना पकडण्यासाठी पोलीस प्रशासनाची कुठेतरी कमतरता दिसू लागली आहे.तालुक्यातील अवैध रेती माफियांमुळे रात्रीच्या वेळेस राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई लगत राहात असलेल्या जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या अवैध रती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर च्या सायलेन्सर च्या फुटलेल्या कर्कश आवाजामुळे जनतेची रात्रीची झोप उडाली आहे. गस्तीवर असलेले काही पोलीस अधिकारी यांनी रेती माफीयांशी हातमिळवणी केल्याची सुद्धा जनतेमध्ये चर्चा आहे.नेहमी वृत्तपत्रांच्या माध्यमातून तसेच वेब पोर्टल च्या माध्यमातून पत्रकार या अवैध रेती वाहतुकीची माहिती प्रकाशित करीत असतो व प्रशासनाच्या लक्षात आणून देत असतो.यामुळे पत्रकारांच्या घरांवर या रेती माफियांचे कधी हल्ले तर कधी जीवे मारण्याची धमकी मिळत असेल आणि या माफियांवर कारवाई करण्यात येत नाही.म्हणूनच या रेती माफियांची मोठ्या प्रमाणावर दादागिरी वाढत चाललेली दिसून येत आहे. या अवैध रेती व्यवसायामध्ये राजकिय पक्षाच्या महिलांचा सुद्धा समावेश आहे.अशीही मोठ्या प्रमाणावर जनतेमध्ये चर्चा रंगली आहे.याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी यांचेही दुर्लक्ष होतांना दिसत आहे. जिल्हाधिकारी यांनी गोपनीय भरारी पथक नेमून या रेती माफियांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!