ग्राम परिस्थितीकी विकास समिती किन्हाळा अंतर्गत लाभार्थ्यांना गॅसचे वितरण

ग्राम परिस्थितीकी विकास समिती किन्हाळा अंतर्गत  लाभार्थ्यांना गॅसचे वितरण
 शेगाव... जगदीश पेंदाम

      येथून जवळच असलेल्या किन्हाळा  येथे गावातील लाभार्थ्यांना ग्राम परिस्थितीकी विकास समिती अंतर्गत गॅसचे वितरण करण्यात आले...
डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जनधन विकास योजने अंतर्गत ग्रामीण भागात वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असुन आज दि.13 आक्टोंबर रोजी ग्राम परिस्थितीकी विकास समिती अंतर्गत सोनेगाव भानुसखिंडी क्षेत्रात येत असलेल्या किन्हाळा गावामध्ये लाभार्थ्यांना गॅसचे वाटप करण्यात आले असून यावेळी उपस्थित वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव ताडोबा सतीश शेंडे,क्षेत्रसहाय्यक सोनेगाव एस.एम. ननावरे, सोनेगाव बीटचे वनरक्षक केशव कदम तसेच ग्राम परिस्थितीकी विकास समितीचे अध्यक्ष,किशोर जांभूळे,व सदस्य , पो.पाटील मंगरे  गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात  यावेळी उपस्थित होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!