चंद्रपुरच्या वेशभुषाकार विकास चहारे ची “पल्याड” फिल्म ४ नोव्हेंबरला चित्रपटगृहात येऊन धडकनार !!
चंद्रपुरच्या वेशभुषाकार विकास चहारे ची “पल्याड” फिल्म ४ नोव्हेंबरला चित्रपटगृहात येऊन धडकनार !!
नाटक असो.. सिरीयल असो.. वेब सिरीज असो.. शॉर्ट फिल्म असो की मोठी फिल्म.. बॉलीवूड असो टॉलीवूड या असो हॉलीवुड या सर्वांमध्ये चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, कला, रंगभूषा, कलाकार, या पडद्यावर दिसणाऱ्या गोष्टींमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे वेशभूषा चित्रपटाच्या विविध पहेलूंचा अभ्यास केला तर लक्षात येईल की चित्रपटाचा दर्जा हा चित्रपटात जितकं दिसणं महत्त्वाचं असतं तितकच त्यात बारकाईने अभ्यास करून परिस्थितीनुसार वापरलेल्या कपड्यांना देखील असते कारण चित्रपट जितका पडद्यावर चांगला दिसावा यासाठी चित्रपटाचा वेशभूषाकार पडद्यामागे दिग्दर्शका सोबत प्रचंड मेहनत घेत असतो चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेमला सजवण्याचे काम एक वेशभुषाकार करत असतो पल्याड बाबतीतही असंच घडलंय..
बॉलीवुड असो वा मराठी चित्रपट आपल्या प्रामाणिक कामामुळे सगळ्यांचा लक्ष वेधण्याचा काम विकास चहारे या मराठमोळ मराठी माणसानं केलय पल्याड हा चित्रपट विकास साठी एक वेगळ्या धाटणीचा आणि चॅलेंजिंग असा विषय होता या आधी कधीही स्मशान जोगी प्रत्यक्षात पाहिलेला नसताना त्याच्या विषयी कोणत्याही प्रकारे काही माहिती नसस्थानां विकास साठी हा एक संशोधनाचा भाग होता तरीही ते चॅलेंज विकास ने स्विकारले व चांगल्या पद्धतीने हाताळलेलं पल्याड पाहताना आपल्या लक्षात येईल प्रदर्शनापुर्वीच प्रसिध्दीची अति उच्चतंम शिखर पार केलेल्या पल्याड चित्रपटाची चर्चा सर्वत्र होताना दिसतेय.. भारतातचं नव्हे तर अमेरिका, चीन, दक्षिण कोरीया, भुतान, न्युयॉरक, स्पेंन, लडंन, हॉगकॉग, टोरंटो, टोकीयों, सिक्कींम, न्यु दिल्ली, कोलकत्ता, तमिलनाडू, ढ़ाका, मुबई, स्विड़न, यु.एस.अे. अशा अनेक ठीकाणी फेस्टिंवेलद्वारे चित्रपटाची स्क्रींनिंग करण्यात आली. चित्रपटाचा चालु असलेला हा प्रवास थक्क करणारा आहे. “पल्याड” चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीचे तसेच विदेशी भुमीत आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व सक्षमरित्या पार पाडताना दिसतोय.. अवार्डस् ही मिळवतोय.. अशा अनेक ठीकाणी राष्ट्रीय, आतंरराष्ट्रीय, विदेशात जाऊन धुमाकुळ घालतोय...आज पल्याड ने अमेरिकेच्या फोर्ब्स’ मासिका पर्यन्त मजल मारलिय.. विकास चा हा चित्रपट बाहेरच्या देशातल्या लोकांना भारतीय संस्कृतीतील हिंदू धर्मातील स्मशानजोगी त्याच्या राहणीमानाविषयी माहिती देतोय त्यात विकास चहारे चा नक्कीच खारीचा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही या ध्येयवेड्या वेशभूषाकाराने सुरुवातीपासूनच कठीण परिश्रम करून स्वतःला या चंदेरी दुनियेत सिद्ध केलय.. पल्याड चा विषय वाटतो तितका सोपा विकास साठी नक्कीच नव्हता, अभिनेता शशांक शेंडे यांचा स्मशान जोगी पेहराव हा उबेहूब स्मशान जोगी वाटावा यासाठी विकास नी कमालीची मेहनत घेतली अभिनेत्री देविका दफ्तरदार यांना एका स्मशान कुटुंबातली गृहिणी दाखवताना त्याच्या कामाचा आणि उत्साहाचा परिचय चित्रपटात दिसून येईल चित्रपटाची कॉस्ट्यूमची जबाबदारी एक हाती विकासाने पेल्लीय त्यासोबत कोमल चौधरी आणि समीर विरूतकर हे नविन कोणताही चित्रपटा विषयी कामाचा अनुभव नसतांना त्यांना सोबत घेऊन संशोधनाचे बारकावे समजाऊन सागत विकासने पल्याडची ही अवघड वाटनारी मोहीम पार केलीय त्यासाठी त्याने त्याचा मुबंई चा मित्र जो की पद्मावत आणि बाजिराव मस्तानी या हीन्दी फिल्म चा सहाय्यक वेशभुषाकार तिरंथलाल पाटवा व तसेच चंद्रपुर चे एस.पी कॉलेज सिनियर नाटय क्षेत्रातील दिग्दर्शक सुशिल सहारे यांची मदत शशांक शेंडे च्या स्मशानजोगी लुक साठी लागणार्या पेहरावा साठी या दोघांचे मार्गदर्शन मिळाले त्यात तिरंथलाल पाटवा याच्या सोबत स्मशानजोग्याचे कपडे, रूद्राक्ष माळा, टोपी, झोळ्या, आंतर वस्त्र, ई. सर्व कपडयाचे तसेच सहकलाकांर देविका दफ्तरदार, रूचित निनावे, देवेद्र दोडके, विरा साथीदार, सायली देठे, गजेश कांबळे, याच्या ही वेशभुषे साठी लागणार्या कपडयाचा मुंबई येथें रात्र-दिवस शोध घेत पुर्ण केला तो एक वेगळा संशोधनाचा भाग होता कारण चित्रपटाची कथा ही एक ग्रामिण भागातील नावा प्रमाणे पल्याड देवपाट गावात घडतेय त्याचे राहणीमान, त्या काळातली कपडयाची ठेवन गावातील लोंकानची वेगवेगळ्या पद्धती कपड्याचे ठेवण हे सार आव्हानात्मक होत चित्रपटाचे शुटींग चालु झाले त्या आधिच्या काळात प्रि-प्रोण्डशन चालु असतांना लेखक सुदर्शन याच्या कडून कथे विषयी जाणुन घेत आणि त्यांच्याशी सारख्या चर्चा करून चित्रपटाच्या रिसर्च चे काम सोपे झाल्याचे विकास नेहमीच आपल्या बोलण्यातुन आवर्जुन सागतात त्यात दिग्दर्शक शैंलेश दुपारे यांनी दाखवलेल्या विश्वासावर ही विकास तोंड भरून कौतुक करतांना दिसतात विकास यांचे शिक्षण एस.पी.कॉलेज चंद्रपुर येथे फॅशन डिझायनर मास्टर डींगरी पुर्ण केली त्यानंतर अनेक हिंदी, मराठी, ऍड शूट, वेब सिरीज, सिरीयल अशा अनेक ठिकाणी आपलं कामाचा अनुभव हाताशी घेऊन चित्रपटसृष्टीत आपले पाऊल ठेवले आणि आजत्यागत चित्रपटसृष्टीत वेशभूषाकार म्हणून काम चालूच आहे अनेक कामे येणाऱ्या काही दिवसात आपणास बघावयास मिळेल परन्तु ईतर कामा पेक्षा “पल्याड” फिल्म करताना या आधी केलेल्या कोणत्याही कामापेक्षा खुप च कस लागला खुप मजा ही आली त्यामुळे पल्याड चित्रपटा कडून खुप सार्या अपेक्षा वाढल्याय प्रेक्षकांना ही पल्याड आवडेल अस विकास बोलत होते कारण आत्ता पर्यन्त अशी स्टोरी जी की शिक्षण व्यवस्था आणि अंधक्षद्धा या सामाजिक विषयाला भाष्य करतेय लेखक सुदर्शन खडांगळे याची दमदार कथा आणि शैलेश दुपारे यांच कंसलेल दिग्दर्शन प्रेक्षकांना बघावयास मिळेल एलिवेट फिल्मस् आणि लावण्याप्रिया आर्टस् ह्यांच्या संयुक्त विद्यमाने 'पल्याड' या मराठी सिनेमाची निर्मिती झाली.. चित्रपटाचं शूटिंग चंद्रपुर जिल्हयातील सिंदेवाही, मरेगांव, कुकडहेटी, चिकमारा, शिवनी, राजोली, घोट या ग्रामिण भागात पार पडले “पल्याड” हा सामाजिक विषयाला भाष्य करणार्या एका परिवारात घडलेल्या काही कडू-गोड गोष्टीवर आधारीत संवेदनशील चित्रपट आहे. “पल्याड” या चित्रपटाचे दिग्दर्शन चद्रपुर शहरातील सुपुत्र शैलेश भिमराव दुपारे एफ.टी.आय.आय (FTII) मध्ये दिग्दर्शनाचे प्राविण्य मिळवलेल्या मराठमोळ युवकाने केलय तर चित्रपटाची कथा लेखक सुदर्शन खडांगळे यांनी लिहीलीय. तसेच चित्रपटातील उत्कृष्ठ आणि प्रेक्षकांना खिळून ठेवणारी पटकथा - संवाद लेखक सुदर्शन खडांगळे व शेलेश दुपारे यानी लिहीलीय. या चित्रपटा मध्ये २५ लोंकाची टेक्निकल टीम अहोरात्र काम करीत होती सगळे मिळून ७५ लोंक ह्या चित्रपटात दिसणार आहेत. छायाकंन – मोहर माटे, मेकअप- स्वप्निल धर्माधिकारी, आर्ट डिरेक्शन- अनिकेत परसावर, ऐड़ीटींग- मनिष शिर्के यानी केलय.. चित्रपटात ४ गाणी असून चित्रपटाची गाणी अरुण सागोंळे व प्रंशात मडपुवार यांची असून संगीत दिग्दर्शन जगदीश गोमिला व सॅम.ए.आर, तुषार पारगावकर, ह्यांनी दिलंय. चित्रपटाचे वितरक के.सेरा सेरा हे चित्रपटाचं मार्केटींग म्हणुन काम पाहत आहे. चित्रपट सर्व रंसिक प्रेक्षकानी ४ नोव्हेंबर ला चित्रपट गृहात जाऊन बघावा हीच आमच्या कामाची पोहच पावती असेल असे पत्रकाराशी बोलतांना विकास चहारे बोलत होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!