राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयतीनिमित्त चिमूर येथे ज्येष्ठांचा सत्कार समारंभ व भजनसंध्या, देशभक्तीपर गीत कार्यक्रम संपन्न

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : -  दि.०२/१०/२०२२ ला चिमूर शहर काँग्रेस कमिटी व विधानसभा युवक काँग्रेस कमिटी,चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयतीनिमित्त ज्येष्ठांचा सत्कार समारंभ व भजनसंध्या, देशभक्ती पर संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व शहीद बालाजी रायपूरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी माजी मंत्री,तथा माजी आमदार डॉ. अविनाशभाऊ वारजुकर प्रमुख अतिथी म्हणून - ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर डॉ. सतिशभाऊ वारजुकर, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ. नामदेवजी किरसान साहेब,माजी तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी चिमूर प्रा.राम राऊत सर, अध्यक्ष चिमूर तालुका काँग्रेस कमिटी संजयजी घुटके, माजी अध्यक्ष ता.काँ.क.माधवबापू बिरजे,पोलीस निरीक्षक मनोजजी गभने,सेवादल अध्यक्ष सिंगरे साहेब, कार्याध्यक्ष ता.काँ.विजयजी गावंडे,ज्येष्ठ काँग्रेस नेते धनराजजी मालके,माजी शहर अध्यक्ष भिमरावजी ठावरी,माजी अध्यक्ष जि.म.को.बँक संजयजी डोंगरे, शहर अध्यक्ष अविनाश अगडे,युवक काँग्रेस अध्यक्ष चिमूर विधानसभा रोषणभाऊ ढोक, ता.काँ.कमिटी उपाध्यक्ष विजयजी डाबरे, कादरजी शेख,विनोदभाऊ ढाकुंनकर,रहेमान पठाण,ओंमभाऊ खैरे, अध्यक्ष ओबीसी विभाग,विलास डांगे,अध्यक्ष महिला तालुका काँग्रेस सविताताई चौधरी,माजी पंचायत समिती सदस्य भावणाताई बावनकर, नर्मदाताई रामटेके,वानिताताई मगरे, राणीताई थुटे, गिता रानडे,ममता भिमटे, वैशालीताई शेंडे,प्रीती दिडमुठे, व संपूर्ण महिला, पुरुष,युवक,युवती काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!