विद्यार्थ्यांनी दिली वाढदिवसाच्या दिवशी विद्यालयाला पुस्तके भेट

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अभिनव उपक्रम..


 तळोधी(बा) 15/10/2022
    प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रबळ आत्मविश्वास असलेले डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू होते. गुळगुळीत मन आणि दयाळू स्वभावाचे त्याचे वैशिष्ट्य होते. त्यांनी देशातील तरुण पिढीला आपल्या विचारांनी आणि कृतीने भारावून टाकले होते. भारत नक्कीच महासत्ता बनेल असा विश्वास त्यांनी प्रत्येक भारतीयांच्या मनात निर्माण केला होता. 
   डॉ.कलाम नेहमी म्हणायचे की चांगले पुस्तक हे शंभर मित्रांसारखे असते. म्हणून, शालेय मुलांनी डॉ.कलाम यांची पुस्तके वाचावीत, तसेच इतर साहित्य शक्य तितके वाचावे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या दृष्टीने विद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन आयोजित करण्यात आला होता.
   या कार्यक्रमाचे औचित्य साधुन वर्ग ७ अ च्या  कु.भैरवी घनश्याम बोरकर व  ,कु.संजना सुखदेव मानापुरे या विद्यार्थीनींनी लोकसहभागातून(माजी विद्यार्थी) तयार करण्यात आलेल्या पुस्तकपेढीमध्ये थोर नेत्यांची वाचनीय पुस्तके भेट दिलीत. पदवीधर शिक्षक संतोष नन्नावार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या 'वाढदिवसाच्या दिवशी पुस्तक भेट' या उपक्रमात विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलामांच्या नावाने वाचन कट्टा तयार करण्यात आलेला आहे.या वाचन कट्यावर विद्यार्थी नियमित इंग्रजी, हिंदी ,मराठी वृत्तपत्राचे वाचन करत असतात.
   कलाम यांचे लेखन विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार करण्यास, कृती करण्यास आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रेरित करेल. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजातील इतर घटकांमध्ये वाचनाची आवड, आणि प्रेरणा निर्माण करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना जीवनात वाचनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
     यावेळी मुख्याध्यापक ए.वाय.बांगरे,जेष्ठ शिक्षक पि. यु.गिरडकर,एस.व्ही.बालमवार, श्री.आर.एम.निनावे,आर.डी. हांडेकर,ए.एन. कोहळे, पी.बी.पाकमोडे,ए.सी.सगळाम, के.वाय.नागपुरकर,ज्योती मोहूर्ले,स्नेहा भरडकर, संजय शेंडे, सुरेश कुंभरे, बालू भगत यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!