चिमूर तालुक्याचे अन्न पुरवठा अधिकारी यांना तात्काळ निलंबित करा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सतिश वारजूकर यांचा आरोप


तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दि .२०/१०/२०२२ राज्य शासनाने महाराष्ट्रातील गोर-गरिब जनतेची दिवाळी साजरी करण्यात यावी असा उद्देश ठेवून आनंदाच्या शिधा हि योजना राबविण्यात आली. आणि या आनंदाच्या शिधा उपक्रमाची सुरुवात झाली.या योजनेचा लाभ १०० रु. मध्ये गरीब राशन कार्ड धारक जनतेला मिळणार आहे. १ लिटर  गोडे तेल, १ किलो साखर, १ किलो चना डाळ, १ किलो रवा, असे देण्याचे ठरवले असून मात्र या योजनेचा वाटप चुकीच्या पद्धतीने केल्या जात आहे. चिमूर शहरातच नाही तर तालुक्यातील ग्रामीण भागात सुद्धा तालुक्याचा अन्न पुरवठा अधिकारी फुलके भारतीय जनता पार्टी च्या इशाऱ्यावर नाचत असल्यागत वागत आहे.ग्रामीण भागातील राशन दुकानातुन तथा स्थानिक प्रथम नागरिक अथवा ग्राम पंचायत सदस्य यांच्या हस्ते या राज्य शासनाच्या आनंदाच्या शिधा योजनेचा लाभ देण्यात यावा परंतु असे न करता या संपूर्ण किट चे वाटप भाजप कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात यावे असे आदेश ग्रामीण भागातील राशन दुकानदारांना अन्न पुरवठा अधिकारी फुलके यांनी दिला असा आरोप डॉ. सतीश वारजूरकर यांनी केला. असून या सर्व प्रकरणाची जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना तक्रार डॉ.सतीश वारजूरकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रपूर यांनी केली आहे.तसेच जिल्हाधिकारी यांनी याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असून तात्काळ निलंबन प्रक्रिया राबविण्यात आली नाही तर उद्या दिनांक.२१/१०/२०२२ ला उपविभागीय अधिकारी यांच्या चिमूर कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.भाजप तर्फे या अन्न पुरवठा अधिकाऱ्यानी आर्थिक चिरीमिरी करून हा उपक्रम राबवित असल्याचा सुद्धा आरोप यावेळी करण्यात आला आहे.याची चर्चा चिमूर तालुक्यात झपाट्याने सुरू असून जनतेचे उद्या होणाऱ्या ठिय्या आंदोलनाकडे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!