साई मंदिर तळोधी येथे ग्रामपंचायत सेवानिवृत्त कर्मचारी यांना निरोप समारंभ संपन्न

साई मंदिर तळोधी येथे ग्रामपंचायत सेवानिवृत्त कर्मचारी यांना निरोप समारंभ संपन्न
तळोधी (बा.);
             महाराष्ट राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन  शाखा नागभीड च्या वतीने  साई मंदिर तळोधी येथे ग्रामपंचायत च्या सेवानिवृत्त कर्मचारी यांना निरोप समारंभ संपन्न झाला. 
या कार्यक्रमाची सुरुवात गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुजन करुन्‍ मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
त्यानंतर ग्रामपंचायत सेवानिवृत्त कर्मचारी श्री.प्रभाकरजी गराडे,नारायण मेंढे,नारायण अमृतकर,देवराम सिडाम,संतोष लांजेवार,महादेव नक्षीणे,सुरेश मेश्राम यांना शाल व श्रीफळ व गुच्छा देवुन निरोप देण्यात आले.
 श्री.अतुल दादाजी पांडव ग्रामपंचायत कर्मचारी युनी.अध्यक्ष नागभीड यांनी प्रास्ताविक करताना  "ग्रा.पं. कर्मचा-यांकडे कुणीही लक्ष देत नाही तर मी त्यांचा मान सन्मान व्हावा या उदेशाने व एकतेच्या भावनेने हा निरोप देण्यात येत आहे."असे म्हनाले.
        तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन ॲड.सौ.शर्मिला रतनकुमार रामटेके यांनी आपल्या मार्गदर्शनातुन सांगीतले  की, "भारत देशात लोकशाही आहे व देशाचा कारभार हा भारतीय राज्यघटनेनुसार चालत आहे आणि भारतीय राज्यघटनेमध्ये समान किमान वेतन आयोगानुसार सर्वाना समान वेतन मिळाले पाहीजे आहे परंतु तसे न होता ग्रामपंचायत मध्ये काम करणारा व्यक्तीला समानता न देता तुटपुंज्या वेतनावर काम करायला येथील सरकार मजबुर करीत आहे,".
मा.श्री.प्रशांतभाऊ गायकवाड यांनी सुध्दा मार्गदर्शन केले.
      शरदभाऊ सोनवाने यांनी ग्रामपंचायत कर्मचारी यांची व्यथा सविस्तर मांडले, दिवाकरजी चावरे , सौ.अश्वीनी मेश्राम कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी संघटनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला मा.अश्वीनी मेश्राम ग्रा.पं.कर्मचारी युनी.अध्यक्ष चंद्रपुर, अतुल  पांडव ग्रा.पं.कर्मचारी युनी.अध्यक्ष तालुका नागभीड, ॲड.सौ.शर्मिला रामटेके सरपंच नवेगांव पांडव, .प्रशांतभाऊ गायकवाड सरपंच गिरगाव, मा.श्री.शरदभाऊ सोनवाने उपसरपंच गिरगाव, .सुनिल मडावी ग्रा.पं.कर्मचारी युनी.अध्यक्ष तालुका राजुरा, दिवाकरजी चावरे गिरगाव, तसेच प्रामुख्याने ग्रामपंचायत कर्मचारी युनीयन चे सर्व सभासद व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते,
या कार्यक्रमाचे संचालन प्रमोदभाऊ गोंगल यांनी केले. व सर्व पाहुण्याचे आभार प्रदर्शन श्री.अतुल दादाजी पांडव  यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!