एफ.ई.एस.गल्स॔ काॅलेजमध्ये नवरात्री उत्सव 2022 चे आयोजन
प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल
फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपुर द्वारा संचालित एफ ई एस गर्ल्स कॉलेजच्या सांस्कृतिक व शैक्षणिक विभागाच्या वतीने व संस्थेचे अध्यक्ष मा.अॅड. श्री विजय मोगरे यांच्या प्रोत्साहनाने नवरात्री उत्सव 2022चे आयोजन करण्यात आले.या उत्सवाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ मिनाक्षी ठोंबरे तसेच नृत्य प्राशिक्षक श्री.रोहित तुरानकर,श्री रितिक चाफले,श्री शुभम गोंविदवार मिस्टर इंडिया 2022, महाविद्यालयातील रासेयो अधिकारी प्रा.डाॅ.राजेंद बारसागडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते
अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या नवरात्री उत्सव 2022 मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थिनीनी एकल नृत्य,समुहनृत्य,गरबा,गोधंळ सादर केले विद्यार्थिनीनी सादर केलेले गोंधळ हे या उत्सवाचे विशेष आकर्षण होते.
त्यातून महाराष्ट्र ची लोककला व संस्कृती चे दर्शन घडवुन ती संवधि॔त करण्याचा महत्वपूर्ण संदेश दिला या उत्सवाला महाविद्यालयातील विद्यार्थिनी चा उत्तम प्रतिसाद मिळाला
नवरात्री उत्सव 2022चे सुत्र संचालन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ कल्पना कावऴे यानी केले या उत्सवाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ कल्पना कावऴे, प्रा डॉ सुवणा॔ कायरकर,प्रा डॉ मेघमाला मेश्राम,प्रा अशोक बनसोड,प्रा डॉ आंनद वानखेड़े यानी केले
या सांस्कृतिक कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनीनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!