भाजप च्या दोन कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस ला दिली जीवे मारण्याची धमकी

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - अवैध रेती व्यावसायिकांविरोधात व्हॉट्सऍप ग्रुप वर थोडक्यात मजकूर व काही रेतीचे फोटो पोस्ट केल्याने तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विलास मोहिणकर यांना आज दिनांक.२९/०९/२०२२ ला दुपारी ०२:१५ वाजता च्या दरम्यान चिमूर शहरातील जुना बस स्टॉप येथे भाजप चे दोन कार्यकर्ते (१) भूषण सातपुते (२) गोलू उर्फ हर्षद भरडकर यांनी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीने येऊन जीवे मारण्याची धमकी दिली.याबाबत चिमूर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत कलम ५०४ ,५०६  अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशन करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!